गोंधळेवाडी स्वस्तधान्य दुकानदारांची मनमानी | कारवाईसाठी अन्न,पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे तक्रार

0



संख,वार्ताहर : गोंधळेवाडी (ता.जत) येथील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात माल जास्त दराने विकला जात आहे.याची चौकशी करावी.अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत नाही.अशी तक्रार प्रहार अपंग क्रांती आंदोलन राज्य संपर्क प्रमुख रामदास खोत यांनी अन्न पुरवठा मंत्री छागन भुजबळ यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.








निवेदनाची प्रत जिल्हा पुरवठा अधिकारी, तालुका पुरवठा अधिकारी,तहसीलदार यांच्या कडे केली आहे.निवेदनात नमूद केले आहे,गोंधळेवाडी येथे सरकारमान्य स्वस्त धान्य दुकाना काशीराम गळवे यांचे आहे. दुकानातील माल शासकीय दराप्रमाणे न विकता जादा दराने विक्री होते.शासनाने ठरवलेल्या वेळेनुसार दुकान उघडले जात नाही.मालाची पावती दिली जात नाही. माल घेण्यास आलेल्या अपंग महिला ज्येष्ठ नागरिक विधवा महिला ग्राहकांना उदध्ट बोलून दमदाटी करुन दुकानाबाहेर काढले जाते. 








मालाची रीतसर पावती दिली जात नाही.मालाची शासकीय दर विचारल्यानंतर त्यांचे रेशन कार्ड रद्द करतो अशी दमदाटी केली जात आहे. रेशनकार्ड असून सुद्धा धान्य दिले जात नाही.अन्न सुरक्षा रेशन कार्ड काढण्यासाठी ग्राहकाकडून 2500 ते 3000 रुपयेची मागणी केली जाते.शिल्लक राहिलेले धान्य किराणा दुकानांत विक्री केली जाते.





Rate Card




अंत्योदय व बीपीएल कार्डचे धान्य एका महिन्यात नाही घेतल्यास त्या ग्राहकांचे कार्ड रद्द केले जात आहे.त्याची यादी दुकानाच्या बोर्डवरती लावली जात नाही.ती मागितल्यास दिली जात नाही.दुकानाची चौकशी करून रजिस्टर तपासण्यात यावीत.ग्राहकांचा जबाब घेण्यात यावेत.खातेनिहाय चौकशी होऊन दुकान चालक काशीराम वेताळ गळवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा.अन्यथा उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.








ग्रामपंचायतीचा ठराव : स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करावी. या मागणीचा ग्रामपंचायतीने ठराव केला आहे.ठराव तहसील कार्यालयाकडे पाठविला आहे.








Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.