जत ‌तालुक्यात वाळूतस्करी रोखण्यात प्रशासन अपयशी!

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ओढा पात्रातून शासनाला एक रुपयाही न भरता वाळूतस्कर हजारो ब्रास वाळूूूचा उपसा करीत आहेत. त्यामुळे शासनाला जाणारा कोट्यवधींचा महसूल तस्करांच्या खिशात जात आहे. याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शासकीय व राजकीय यंत्रणेचीही साथ लाभत असल्याने वाळूतस्कर महसुल यंत्रणेच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.Rate Card

नदी-नाल्यातील वाळू हा शासनाच्या महसुलाच्या प्रमुख स्त्रोतांपैकी एक आहे. परंतु, जत तालुक्यातील या वाळूचा लिलाव न झाल्याने शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतो असतानाही प्रत्यक्षात या नदी,ओढे,तलावातून मोठया प्रमाणात वाळूचा उपसा राजरोसपणे सुरू आहे. महसूल यंत्रणाही कुठे प्रामाणिकपणे तर कुठे केवळ देखाव्यासाठी कारवाईचा बागुलबुवा उभा करताना दिसत आहे. खामगाव- शेगाव तालुक्यांमध्ये वाळूतस्करांची प्रचंड दहशत आहे. 
पथक नावालाच!


वाळू तस्करी रोखण्यासाठी पथके गठीत करण्यात आले आहे. मात्र, या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे रेती तस्करांशी साटेलोटे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.