वाळेखिंडी,बेवनूर,कासलिंगवाडी येथे डाळींब परिसंवादाचे‌ आयोजन

0






जत,प्रतिनिधी : अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठान व जत‌ कृषी विभागाच्या वतीने आज वाळेखिंडी,बेवनूर,कासलिंगवाडी येथे

अतिवृष्ठीमुळे धोक्यात आलेल्या डाळिंब बागातील कळी गळीत रोकण्यासाठी मार्गदर्शन,परिसंवादाचे‌ आयोजन केले असल्याची माहिती प्रतिष्ठाचे‌ अध्यक्ष अँड.प्रभाकर जाधव यांनी दिली.

जाधव म्हणाले,जत‌‌ तालुक्यातील वाळेखिंडी, कासलिंगवाडी,बेवनूर परिसरात मोठ्या‌ प्रमाणात डाळिंब पिक घेतले जाते.







गेल्या संप्टेबर,ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्ठीमुळे डाळिंब बागावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे भविष्यात कळी गळीतचा फटका बसण्याची शक्यता आहे.त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने यासंदर्भात डाळिंब कळी गळित‌ या संदर्भात तज्ञाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.यावेळी जतचे‌ कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. आज वाळेखिंडी येथे‌ 10 वाजता,बेवनूर येथे‌ 11.30 वाजता,तर‌ कासलिंगवाडी येथे 1.30 वाजता या परिसंवादाचे‌ आयोजन करण्यात आले आहे.

Rate Card







 त्यात प्रांरभी ग्रामपंचायत‌ कार्यालयात मार्गदर्शन,काही प्रमुख बागाची बांधावर‌ जात पाहणी करण्यात येणार आहे. या परिसंवादासह परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थितरहावे,असे आवाहन अँड.जाधव यांनी केले आहे.





Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.