घरे,शेत जमिनीचे नुकसान करणाऱ्या कंपनीवर कारवाई करा ; संभाजी बिग्रेड

0जत,प्रतिनिधी : दिलीप बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बेवनूर येथे दगड उत्खनन चालू असून शेजारील जमिनीवर अतिक्रमण व परिसरातील घरांचे बोर ब्लास्ट मुळे होणारे नुकसान आणि जीवनास धोका व अन्याय त्वरीत थांबवा व झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई त्वरित द्यावी,अशी मागणी संभाजी बिग्रेडच्या वतीने करण्यात आली आहे.तसे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे, अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी कोणतीही काळजी सदर कंपनीने आजआखेर घेतलेली नाही.मौजे बेवनूर येथील गटनंबर 249 मध्ये दिलीप बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे उत्खनन चालू आहे.तसेच तेथील शेजारील जमिनीवर ते अतिक्रमण करत आहेत.वारंवार तोंडी सूचना देऊन देखील ते ऐकत नाहीत व मोठ्या प्रमाणात अमोनियाचा वापर करून 20 फुटापेक्षा जास्त खोल बोअर ब्लास्ट करत आहेत. त्यामुळे परिसरातील घरांचे नुकसान  होऊन त्यास भेगा पडल्या आहेत. संरक्षित कंपाऊंड नसल्यामुळे चरायला जाणारी जनावरे खोदलेल्या खड्ड्यात पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.बेजबाबदार पणे काम करणाऱ्या या कंपनीवर कारवाई होऊन अतिक्रमण केलेल्या शेतजमीनींची,घराची नुकसान भरपाई द्यावी,सरकारी मोजणीने  उत्खनन क्षेत्र त्वरित निश्‍चित करावे.सदर जागेस संरक्षित कंपाउंड करावे अशी मागणी 

करण्यात आली आहे.मागण्याची दखल न घेतल्यास शेतकर्‍यांसहित संभाजी ब्रिगेड न्याय मिळेपर्यंत तीव्र आंदोलन करणार आहे.

Rate Cardजिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक,दादासो वाघमोडे,विजयकुमार नाईक,संदिप नाईक, मच्छिंद्र शिंदे, शिवाजी शिंदे,बबन शिंदे,अशोक शिंदे,राजेंद्र शिंदे,तानाजी शिंदे,लक्ष्मिबाई शिंदे, संभाजी शिंदे, नारायण शिंदे,सोपान शिंदे,भारत शिंदे,लक्ष्मण पाटील,मोहन पाटील,नारायण पाटील,बापूसो शिंदे,शिवाजी शिंदे,अरूण शिंदे,विजय शिंदे,इंदूबाई शिंदे नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.जत : बेवनूर मधील शेतीसह घराचे नुकसान करणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी,या मागणीचे निवेदन देण्यात आले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.