जत‌ तालुक्यातील प्रत्येक गावचा विकास करण्याचे स्वप्न ; आ.विक्रमसिंह सांवत | अंकलेत जम्बो विकास कामांचा शुभारंभ

0

डफळापूर, वार्ताहर : मते कमी पडली म्हणून निधी देण्यात दुजाभाव करणार नाही.आमदार म्हणून तालुक्यातील प्रत्येक गावांचा विकास करणे हे माझे ध्येय आहे,असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले.


अंकले ग्रामपंचायत हद्दीतील जम्बो विकास कामांचा शुभारंभ आ.सांवत यांच्याहस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,जि.प.सदस्य महादेव पाटील,सुजय शिंदे, बाबासाहेब कोडग, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,आप्पा मासाळ,बाजार समिती सदस्य अभिजित चव्हाण,उप अभियंता श्री.शेख,मगदुम,प्रशासक श्री.चव्हाण,श्री.मोरे,रामचंद्र पाटील उपस्थित होते.


आमदार सांवत म्हणाले,तालुक्यातील कोणत्या गावात किती पडले हे महत्वपूर्ण नाही.तर ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखविला,त्याचे उत्तरदायित्व पुर्ण करण्याची जबाबदारी आमदार म्हणून माझ्यावर आहे.ती पुर्ण करण्याचा माझा कायम प्रयत्न राहणार आहे.अंकलेत जास्तीत जास्त कामे दिली आहेत.म्हैसाळ योजनेतून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे जत पश्चिम भागाला सदन झाला आहे.यापुढेही तालुक्यातील प्रत्येक विविध योजनेतून विकास कामे आणून गावे स्वंयपुर्ण करू,असा विश्वासही आ.सांवत यांनी व्यक्त केला.


महादेव पाटील म्हणाले,अंकलेतील जनतेनी पाच वर्षापुर्वी ग्रामपंचायतीची सत्ता देऊन जो विश्वास दाखवला,तो सार्थ ठरवत जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा प्रयत्न केला आहे.अंकले येथे  25/15 (मुलभूत विकास योजना)मधून विकास नगर मधील रस्ता डांबरीकरण आणि जानकर वस्ती सिद्धनाथ मंदिर सभामंडप,जि.प.अनुसुचित जाती घटकांच्या वस्तीचा विकास करणे यामधून रस्ता कॉंक्रीट करणे,बंदिस्त गटारी बांधणे, वित्त आयोगाच्या निधीमधून अंगणवाडी संरक्षित भिंत बांधणे,किचनशेड दुरुस्तीआणि डीपीडीसी मधून शाळा दुरूस्ती मंजूर झालेल्या कामांचे भूमीपुजन करण्यात आले. 

Rate Cardशामा सुंभळे(मिरवाड),वसंतराव चव्हाण, संजय पाटील(बेळुंखी),चांदभाई,मभाजी (धावडवाडी),रवी पाटील,घुंगरे सर(कंठी),शहाजी जाधव (खलाटी),शंकर वगरे,सरगर काका, सुनील दुधाळ,आप्पासाहेब जानकर, भोसले सर, दिपक खराडे, दिपक गुरव, भारत (दादा) दुधाळ, सावध पाटील,कैलास जानकर,नामदेव जानकर, छगन जानकर,हरिबा टकले,पांडुरंग वगरे, माणिक खराडे, राजकुमार चौगुले, आप्पा एडके,बबलू चंदनशिवे,तुकाराम ऐवळे,संभाजी राजे, काशिलिंग खामगळ,विनायक खामगळ, शरद सरगर, मनोहर सरगर सर, अरूण सरगर,मनोहर सुतार(पोलीस पाटील),संतोष सरगर, पत्रकार नाना गडदे,संजय गुरव इ. उपस्थित होते.

अंकले ता.जत‌‌ येथे विकास कामाचे उद्घाटन करताना आमदार विक्रमसिंह सांवत,जि.प.सदस्य महादेव पाटील आदीshree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.