भिवर्गी,संख,खंडनाळ व वळसंग वाळू तस्करीवर छापे

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील भिवर्गी,संख,खंडनाळ व वळसंग येथे महसूल विभागाच्या पथकाने धाडी टाकल्या.संख येथे वाळूचा डंपर पकडला आहे.तर भिवर्गी,वळसंग येथे वाळूचा ट्रँक्टर चालकांने वाळू टाकून पलायन केला आहे.तर खंडनाळ येथे ट्रँक्टरने वाळू बांधकामासाठी टाकली आहे.त्याचे पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेतपूर्व भागात महसूल विभाग व पोलिसांच्या दुर्लक्षाने बोर नदीपात्रात वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात सुरु होती.


भिवर्गी,बालगाव,हळ्ळी, करजगी,सुसलाद,सोनलगी,बेळोंडगी,संख ही गावे वाळू तस्करीचे प्रमुख केंद्र आहेत.

संख अप्पर तहसिलदार कार्यालयाचे अप्पर तहसिलदार हणमंत म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री बोर नदी पत्रातील भिवर्गी,संख,खंडनाळ येथे धाडी टाकल्या आहेत.भिवर्गी येथे वाळूने भरलेला ट्रँक्टर आढळून आला. ट्रँक्टर पकडून महसूल विभागाच्या पथकाने ट्रँक्टरचा दीड किलोमीटरचा पाठलाग करुन पकडला.


ट्रँक्टर ताब्यात घेऊन संखला घेऊन येत होते.परंतु वाळू तस्करी करणा-या लोकांनी वाटेत जमाव जमवून पळवून नेला आहे.भिवर्गी ते करेवाडी रस्त्यावरील आडवाटेने पळून जाताना ट्राँली पल्टी झाली.ट्राँली तेथेच टाकून ट्रँक्टर पळवून नेला आहे.पथक गेल्यावर पल्टी ट्राँली तस्कराने वाळू तेथेच टाकून नेला आहे.
Rate Card


वळसंग येथे पथकाला वाळूचा ट्रँक्टर वाळूसह दिसून आला.परंतु पथकाच्या हतावर तुरी देत पलायन केले आहे.खंडनाळ येथे ट्रँक्टरने टाकलेली वाळू पकडली आहे.पंचनामा करुन वाळू जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

संख येथे वाळूचा डंपर पकडला आहे.डंपर,वाळू जप्त केला आहे. मालकाला नोटीस देऊन दंड आकारणी केली जाणार आहे.तसेच वाळू तस्करीविरोधात कडक मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती अप्पर तहसिलदार हणमंत मेत्रे यांनी दिली आहे.

संख ता.जत येथे वाळू तस्करी करणारा ट्रक जप्त केला आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.