पुणे पदवीधर मतदार संघात सांगलीला संधी | प्रा.डॉ.निलकंठ खंदारे यांची प्रचारात आघाडी
आटपाडी : पुणे पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि.1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.या निवडणुकीत वाळवा जिल्हा सांगली येथील प्रा.डॉ.निलकंठ खंदारे यांनी गेल्या वर्षभरापासून या मतदारसंघात निवडणूक अर्ज भरून घेण्यापासून ते प्रचार दौरे,सभा,वैयक्तिक भेटी गाठीच्या माध्यमातून जोरदार तयारी केली असून, पुणे पदवीधर मतदारसंघात प्रा.खंदारे यांची उमेदवारी ही शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ आणि सोलापूर व पुणे विद्यापीठाशी संलग्न शिक्षक संघटना तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या इतर 20 पेक्षा जास्त शिक्षक शिक्षकेतर आणी राजकीय संघटना यांच्या पाठिंब्याने जाहीर केली आहे.
डॉ.खंदारे हे शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य असून गेली 24 वर्षे ते शैक्षणिक चळवळीत सक्रिय सहभागी आहेत.ते स्वतः विनाअनुदानित आणि नेट सेट ग्रस्त सारख्या समस्यातून गेले आहेत.त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील एक जाणकार व्यक्ती म्हणून त्यांच्या पुणे पदवीधर च्या उमेदवारी कडे पाहिले जात आहे.बेरोजगार पदवीधरांच्या हाताला काम, शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे, जुनी पेन्शन मिळवणे,तासिका तत्त्वावरील शिक्षक,विनाअनुदानित, 20 टक्के अंशतः अनुदानित घोषित आणि अघोषित अनुदानाच्या संदर्भात प्रश्न, नेट सेट, पीएचडी संदर्भात असणारे प्रश्न, कृषी पदवीधर,वकिली व्यवसाय तसेच इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी इ व्यावसायिक शिक्षणातील अनागोंदी व त्यां क्षेत्रातील शिक्षकांचा महिनोंमहिने वेळेत पगार न होणे, सेवशाश्वती नसणे,फंड व ग्रँचुईटी न मिळणे या न्यायहक्कांसाठी आपण विधीमंडळात निकराचा लढा देऊन,प्रश्नांना वाचा फोडून न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

डॉ.खंदारे यांनी पुणे पदवीधर साठी 1 लाख पेक्षा जास्त नावनोंदणी केली असून 5 जिल्ह्यात त्यांचा दांडगा संपर्क आहे. वरील मुद्यांवर लक्ष केंद्रित करून आपण निश्चितच ही निवडणूक जिंकू असा विश्वास त्यांचे सहकारी पदवीधर व शिक्षक व्यक्त करीत आहेत.