विजापूर- सोलापूर रोडवर गोळीबाराचा‌ थरार ; एकजण ठार,दोघे जखमी

0कोतेंबोबलाद : विजापूर-सोलापूर रोडवर भूतनाळ क्रॉसजवळ चारचाकी गाडीला डंपरने समोरून धडक देत फिल्मी स्टाईलने झालेल्या बेछूट गोळीबारात महादेव साहूकार भैंरगोंड (सावकार)हे गंभीर जखमी झाले आहेत.तर त्यांचा व्यवस्थापक बाबूराम मारूती कंचनाळ(वय 64) हा जागीच ठार झाला आहे.याशिवाय कारचालक लक्ष्मण,गगमँन रमेश व जगबीरसिंग व हुसेन हेही झालेल्या गोळीबारात जखमी झाल्याची घटना घडली आहे.
Rate Card
यात महादेव भैंरगोंड सावकार यांना तीन गोळ्या लागल्याने त्यांना विजापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आहे.दरम्यान जून्या वैमस्यातून हा गोळीबार झाल्याचे समजते आहे.महादेव सावकार यांच्या चारचाकी गाडीला समोरून धडक देत हल्लेखारांनी समोरून दगडफेक करत‌ अंधाधुंद गोळीबार गेला आहे.

याघटनेने विजापूर सह सीमावर्ती भागात खळबळ उडाली आहे.चडचण व पाटील टोळीचा टोळीयुध्दाचा यानिमित्ताने भडका उडाल्याचे चित्र आहे.विजापूर पोलीसाकडून कसून तपास सुरू आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.