डिवायएसपीच्या बंदच्या आदेशानंतर तालुकाभर छुपे अवैध धंदे

0जत,प्रतिनिधी : नवे डिवायएसपी रत्नाकर नवले जत व उमदी पोलीस ठाण्याच्या

हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही काही झारीतील शुक्रचार्याच्या आर्शिवादाने छुपे अवैध धंद्यांना ऊत आला आहे.गुंडाराज,अवैध दारू,मटका,सिंदी,जुगार,वाळू,चंदन, गाज्या बेकायदा वाहतूक यासारखे अवैध धंदे बेधडकपणे सुरू आहेत.

नवे डिवायएसपी रत्नाकर नवले यांनी यापुढे असे अवैध बंद करा,असे आदेश स्थानिक ठाणे प्रमुखांना दिले आहेत.यावर स्थानिक कर्मचारी सतर्क झाल्याने अवैध धंदे‌ चालकांनी आडोशाचा आसरा घेतल्याचे वृत्त आहे.उघड्यावरचे धंदे‌ आता पडद्याआडून सुरू आहेत.

जत,उमदी परिसरातील अनेक गावे सांगली पासून 60-70 किलोमीटर अंतरावर आहेत.त्यामुळे या परिसरात नेमके काय चालते हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बहुधा माहिती नसते.
Rate Cardत्याचा गैरफायदा येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी घेत आहेत.जत व उमदी पोलिस ठाणे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबादीत राखण्यासाठी या पोलिसांची नेमणूक शासनाने केली आहे.मात्र याकडे लक्ष न देता येथील अधिकारी व पोलिसांनी गैरअर्थ काढता अवैध धंद्यांना बळ दिल्याचे वारवांर समोर येत आहे.


जत व उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावात मटका जोमात सूरु आहे दररोज लाखो रुपयांची उलाढाल या मटक्यातून होत आहे.दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटक्याबरोबर हातभट्टी दारू बनावट,पावडर युक्त शिंदीच्या विक्रीने उंच्छाक मांडला आहे.वाळू,गांज्या,चंदन,शस्ञे तस्करांचा राबता जत‌ तालुक्यात कायम आहे.तुटपुज्या कारवाया करून पोलीस मोठ्या गॉडफादरला बाय देत असल्याचे आरोप होत आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.