कोरोनामुळे चिंता,तरीही बिराड निघाली | ऊसतोड मजूरांच्या टोळ्या रवाना : पुर्व भागातील गावे,बाजारपेठा ओस
माडग्याळ,वार्ताहर : अधिकमासमुळे दिवाळी अगोदरच जत तालुक्यासह पुर्व भाग पट्टय़ातील शेतमजूर मोठ्या संख्येने परजिल्ह्यात ऊसतोडणीसाठी रवाना होत आहेत.कोरोना हटण्याचे नाव घेत नसल्याने नवा गळीत हंगाम सुरळीत सुरू होणार आहे. परंतु कोरोना विषाणूमुळे ऊसतोड मजूर चिंतेत तसेच कारखानदारही चिंतेत आहेत. त्यामुळे ऊसतोड मजुरांना शेतावर आणणे हे कारखान्यांसमोरचे आव्हान ठरणार आहे.
यामुळे परिसरातील लहान गावांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. बाजारपेठेवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे.गतवर्षी पेक्षा यंदा साधारण पंधरा दिवस अगोदर टोळ्या रवाना होत आहे.मागील वर्षी दिवाळीत टोळ्या रवाना झाल्या होत्या.गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुकादम आपापल्या मजुरांना परजिल्ह्यात ऊसतोडणीसाठी मजूरांना पाठवत आहेत.
प्रत्येक गावातून ऊसतोडणी मजूर टँक्टर,ट्रकमधून बिऱ्हाड घेऊन बायका,मुले,जनावरे घेऊन निघाल्याचे चित्र तालुक्यातील रस्त्यावर दररोज दिसत आहे.पर जिल्ह्यात साखर कारखाने सुरू होत असल्याने मुकादम मजूर घेऊन जात आहेत. प्रत्येक मुकादमाकडे 15 ते 25 मजूर (कोयते) असतात. मजुरांना पाच-सहा महिने रोजगार मिळत असल्याने मजुरांचा ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यात जाण्याकडे ओढा असतो. पाच-सहा महिन्यात खर्च वजा जाता 1 लाख ते दीड लाखापर्यत मजूरी कमावत असल्याचे एका मजुराने सांगितले. मजुरांसाठी त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली जाते.
औषधोपचाराचा खर्च कारखान्यांकडून मोफत केला जातो. ऊसतोडणी वेळी हिरवा चारा असतो, तो चारा विक्री करून मजूर आपला घरखर्च भागवितात. जेवढी ऊसतोड झाली त्याप्रमाणे मुकादमाकडून ऊसतोड कामगारांना रक्कम वाटप केली जाते. मुकादम आणलेल्या मजुरांची देखरेख ठेवण्याचे काम करतो. तसेच कारखान्याच्या नियोजनाप्रमाणे ऊसतोड केली जाते. दरम्यान, ऊसतोडणीसाठी मजूर मोठय़ा प्रमाणात

कोल्हापूर,सातारा,सोलापुर,उस्मा
जत तालुक्यातून ऊसतोड मजूरांची संख्या यावर्षी मोठी आहे.गेल्या महिन्यात तूफान पाऊस झाला आहे.तरीही ऊसतोड मजूराचे जथ्ये जाताना कायम दिसत आहेत.तालुक्यातील सततच्या अवर्षणामुळे ऊसतोडीसाठी जाण्याची येथील मजूरांची कायम आहे.यावर्षी पडलेल्या पावसामुळे काहीही बदल झालेला नाही.मुक्कादामाकडून घेतलेला लाखभर रुपये घेतलेली अगाऊ रक्कम फेडण्यांची चिंता या मजूरांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.पुढे जवळपास चार महिने ऊस तोड करून ते पैसे मजूरांकडून फेडले जातात.
कारखान्याने मजूराची सुरक्षा हमी घ्यावी ; विक्रम ढोणे
जत तालुक्यातील ऊसतोडीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या सर्वाधिक असते. परंतु कोरोना विषाणूमुळे ऊसतोडणी मजूर चिंतेत असून ऊस कारखान्याने मजूराची सुरक्षा हमी घ्यावी,अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.
जत पुर्व भागातील असे ऊसतोड मजूरांच्या कुंटुबीयांना कारखाना स्थळाकडे घेऊन जाणारे वाहनाचे जत शहरात काढलेले छायाचित्र