शासनादेश पायदळी मास्कची दामदुप्पट दराने विक्री | कारवाई केव्हा ?

0जत,प्रतिनिधी : शासननिर्णयानुसार एन-95 मास्कची किंमत 19 ते 49 रुपये, तीन पदरी मास्क चार रुपये, तर दोन पदरी मास्क तीन रुपये असे दर जाहीर झाले. मात्र, यासंदर्भात शहरातील तीन मेडिकलमध्ये ते एन-95 मास्क चक्क 100 ते 125 रुपयांना विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या प्रतिष्ठानांविरुद्ध कारवाई केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेषता! कुठल्याही केमिस्ट व ड्रगिस्टकडे नागरिकांना दिसेल अशा दर्शनी भागात मास्कच्या किंमतीचे फलक लागलेले नाहीत.हम बोले सो कायदा अशी भूमिका कापड दुकाने,स्टेशनरी,पानपट्ट्या, मेडिकल स्टोअरच्या संचालकांची दिसून आली.19 ते 49 रुपयांना मिळणारे वेगवेगळ्या कंपनीचे मास्क 100 ते 125 रुपयांना विक्री करीत असल्याचे त्यांनीच सांगितले.Rate Card तीन पदरी मास्कचे दर चार रुपये शासनाने निश्चित केले असले तरी या वेगवेगळ्या स्टोअरमध्ये ते 30 ते 35 रुपयांना विकले जाते. दोन पदरी मास्क शासन निर्धारित तीन रुपयांऐवजी 10 ते 15 रुपयाला विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. अशा ड्रगिस्ट व केमिस्टवर एफडीएचे अधिकारी कारवाई करतील का, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.


जुन्याच्या मालाची विक्री

शासनाने मास्क विक्रीसंदर्भात नवीन दर ठरविले. मात्र, आमच्याकडे जुन्या दरात खरेदी केलेले मास्क शिल्लक असल्याने एन-95 मास्क 100 रुपयांना विकावे लागत आहे. अद्याप नवीन मास्क खरेदी केले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मास्कची मागणी घटली. यानंतर शासन नियमांचे पालन करू, असे एका दुकानदाराने सांगितले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.