पेन्शनचा मुद्दा बाजूला ठेवून जुनी पेन्शन संघटना बँकेच्या राजकारणात ; जत तालुका डीसीपीएस धारकांमध्ये प्रचंड नाराजी

0जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने शिक्षक बँक इलेक्शन लढवणार याबाबत भूमिका जाहीर करण्यात आली आहे.या भूमिकेबाबत डीसीपीएस धारकांनी मध्ये प्रचंड अशी नाराजी दिसून येत आहे,जुनी पेंशन संघटना जुनी पेन्शन मिळण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे.मात्र पेन्शन हा विषय बाजूला ठेवून जिल्ह्यातील संघटना वेगळ्या भूमिका घेऊन काम करत आहे.त्या अनुषंगाने यातील डीसीपीएस धारकांनी जतमध्ये एक बैठक घेण्यात आली.त्या बैठकीमध्ये बँक निवडणूक घेण्यासंदर्भात सर्वांनी नाराजी व्यक्त केली.डीसीपीएस धारकांना असे वाटत आहे,की जुन्या प्रस्थापित संघटना आणि पेन्शन हक्क संघटना त्याच्यामध्ये काही फरक नाही.कारण त्या संघटना ज्या पद्धतीने काम करत होत्या.शिक्षक बँकेच्या निवडणूकीचा निर्णय घेऊन जुनी पेन्शन हक्क संघटना सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत त्यामुळे आपले वेगळेपण होतं हे संघटनेने हरवले आहे,असा आरोप रमेश कोळी व सदस्यांनी केला आहे.Rate Card

2005 नंतर लागलेल्या शिक्षकांना एनपीएस मध्ये वर्ग करण्यात यावे,असा शासन आदेश  काढण्यात आलेला आहे.एनपीएस मध्ये वर्ग करण्यासंदर्भात जुन्या पेन्शन संघटनेने स्पष्ट  भूमिका जाहीर न करता शिक्षक बँक निवडणूक लढण्याची भूमिका जाहीर केली.यामुळेही डीसीपीएस धारकांनी मध्ये संभ्रम अवस्था आहे. 

यावेळी बैठकीस रमेश कोळी,काशिनाथ हिटनळी,एस.आर.होसमनी संदीप कांबळे, जटिंगराय डफळापुर,राघवेंद्र अंकलगी, कुमार चौगुले,भीमाशंकर कंबार,शरद कारडे,अनिल हिटनळी मलकाप्पा कटीमणी,श्रावण कुमार कोरे,प्रशांत तेलगाव,सिद्धांना हत्तली,उमेश लिगाडे, सुरेश राठोड,सोमशेखर काखंडकी,ज्ञानदेव चौगुले,तंगोळी सर,दिलीप कांबळे ,मल्लेश कांबळे,कटगिरी सर,कडगनवर  सर,उमेश कोळी, एम.एम.बिराजदार,महादेव भोसले,संदीप पाथरूट,अजमानी सर,सुभाष कासेकर,मुकेश भोरे व इतर डीसीपीएस धारक उपस्थित होते.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.