दुभंगला रस्ता,लागली वाट | विजापूर-गुहागर महामार्गाची अवस्था ; संबंधितांनी मात्र फिरविली पाठ

0जत,प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्ग असलेल्या गुहागर ते विजापूरचे काम निकृष्ठ झाले असून वर्षपुर्ती होण्याअगोदरच मार्गाला भेगा असून आणखीन काही  दिवसात यामुळे दोन दिवसात दोन वेगवेगळे रस्ते होण्याची भिती व्यक्त होत असून या भेगामध्ये अडकून दुचाकीचे अपघात वाढले आहेत.संबधित विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची पुर्ती वाट झाली आहे. तात्काळ रस्ता दुरुस्त करावा,अन्यथा आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटकला जोडणारा हा महामार्गाच्या  विजयपुरला जाणाऱ्या जत ते मुचंडी दरम्यान सुमारे दोन किलोमीटर अंतरा एवढे‌ या महामार्गावर मोठमोठ्या भेगा पडून मार्ग दुभंगला आहे.काम होऊन वर्षपुर्ती साजरी होण्या अगोदरच दर्जाहिन झालेल्या कामांची पोचपावती यानिमित्ताने मिळाली आहे.मोठा ठेकेदार व कोल्हापूर येथे‌ कार्यालय असल्याने जतच्या नागरिकांना तक्रार करायाची असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याचा फायदा घेत संबधित ठेकेदार कंपनीकडून नियम सोडून,बेजबाबदारपणे काम करण्यात येत आहे.भेगा पडलेल्या मार्गावर भविष्यात या महामार्गावर कोणतीही जिवित हानी होऊ नये यासाठी पाठ फिरवलेल्या संबंधित खातेने, उदासीन राजकर्त्यांनी,आणि दुर्लक्ष करणा-या व गांधारीची भुमिका घेतलेल्या प्रशासनाने वेळीच लक्ष देणे काळाची गरज आहे.

Rate Card गुहागर ते विजापुर सध्याचे विजयपुर या महामार्गावरील पडलेल्या भेगाचा विचार करता महामार्गास 40 वर्ष आयुर्मान मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.देखभाल व दुरुस्तीसाठी संबंधित खातेने राखीव ठेवलेली निधी वजा रक्कम अदा न करता संबंधित ठेकेदाराने सर्व कार्यवाही करावी असेही संघटनेचे मत सांगली जिल्हा उपाध्यक्ष सुरेशभ घागरे यांनी व्यक्त केले.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

 या महामार्गाच्या रस्त्याच्या कामाचा दर्जा गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी ध्रुव कन्सल्ट या कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र या कंपनीचे अधिकारी इकडे आलेच नाहीत,अन्यथा जत-मुचंडी या रस्त्यावर पडलेल्या भेगा दुरुस्त कधीच दुरुस्त झाल्या असत्य असे अनेक वाहनधारकांचे म्हणणे आहे.आहे. या रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाल्यापासून कामाच्या दर्जाबाबत मनमानी होत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी मुंबईतील राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडे तक्रार केली आहे.जत-विजयपूर महामार्गाला अशा भेगा पडल्या आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.