डफळापूर-अंनतपूर रस्ता एकादा जीव गेल्यावर दुरूस्त‌ करणार काय ? | संतप्त वाहनधारांचा सवाल

0जत,प्रतिनिधी : डफळापूर ते‌ अंनतपूर गुडघ्याएवढे‌ खड्डे‌ पडूनही जतचे बांधकाम विभागाचे डोळे झाकलेले अधिकारी याकडे बघायला तयार नसल्याने संताप व्यक्त होत असून एकाद्याचा जीव गेल्यावर या अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार काय असा सवाल उपस्थित होत आहे.

जत तालुक्यातील पश्चिम भागातील महाराष्ट्र, कर्नाटकला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे.


राज्य महामार्गाचा दर्जा मिळाल्यावर कर्नाटक सरकारने त्यांच्या हद्दीपर्यतचा रस्ता दुहेरी मार्ग रस्ता केला आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक या मार्गावरून आहे. महाराष्ट्र हद्दीपासून डफळापूर पर्यंतचा रस्ता वास्तविक अगोदरच मजबूत व दुहेरी मार्ग‌ करण्याची गरज होती.मात्र जतचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जुजूबी टेंडर काढत या रस्त्याच्या कामावर कोट्यावधी रुपये गेल्या काही वर्षात उधळले आहेत.मुर्दाड,भष्ट्र,गंभीर आरोप झालेल्या ठेकेदारांना या रस्त्याचे ठेके देऊन दर्जाहिन काम करत शासनाच्या निधीवर डल्ला मारला आहे.


अनेकवेळा रस्त्याचे काम होऊनही पुन्ह: पुन्हा गुडघ्याऐवढे खड्डे पडत आहेत.काही महिन्यापुर्वी जतमधील एका ठेकेदारांनी केलेले या रस्त्याचे काम गायब झाले असून डांबर, मुरमीकरणीच्या खाली गुडघ्याएवढे खड्डे पडले असून ते‌ जीवघेणे बनले आहे.


Rate Card

गेल्या पंधरवड्यात‌ झालेल्या पावसाने वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना मरणयातना सहन कराव्या ‌लागल्या होत्या. गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे.असे असताना अधिकाऱ्यांने पोसलेले लुटारू ठेकेदार व भष्ट्र‌ अधिकारी खड्डे भरण्यासाठी गंभीर दिसत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

डफळापूर-अंनतपूर रस्त्याची झालेली अवस्था

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.