संग्राम जगताप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष

0



जत,प्रतिनिधी : माजी आमदार विलासराव जगताप यांचे राजकीय वारसदार युवा नेते संग्राम जगताप यांची भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

जतचे ताकतवान नेते माजी आमदार विलासराव जगताप यांचे संग्राम नातू आहेत.गेल्या काही वर्षापासून ते जगताप यांच्या राजकीय मैदानात सक्रीय आहेत.


Rate Card




त्यांच्यावर भाजपा नेत्यानी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.जत तालुक्यात भाजपचे कार्य युवकांबरोबर सामान्य जनतेपर्यत पोहचवून पक्ष मजबूत करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील,असे यावेळी बोलताना संग्राम जगताप म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.