पशूवैद्यकीय डॉक्टरांच्या रिक्त पदामुळे दहा हजार जनावराचे आरोग्य धोक्यात | सोन्याळमधील स्थिती ; दवाखाना कुलूपबंद

0



माडग्याळ,वार्ताहर : जत तालुक्यातील सोन्याळ,माडग्याळ सह जत‌ तालुक्यातील अनेक पशुवैद्यकीय दवाखाने डॉक्टराविना पोरके झाले आहेत.नेमणूक ठिकाणे सोडून अनेक शासकीय पशुवैद्यकीय डॉक्टर खाजगी प्रैक्टिस करण्यात धन्यता मान्यत असल्याने सामान्य पशूपालकांच्या जनावराचे आरोग्य धोक्यात आले आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून तालुक्यातील कारभार सुधारावा अशी मागणी होत आहे.






सोन्याळ येथील स्थानिक वर्ग एक श्रेणीतील पशुवैद्यकीय दवाखान्यात गत चार महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने कुलूपबंद आहे.लाखो रुपये खर्चून सुसज्ज असे नवीन इमारत बांधण्यात आले आहे. परंतु  डॉक्टरविना दवाखानाच पोरका झाला आहे. जनावरांना वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आपली हजारो रुपये किमतीची जनावरे गमवावी लागत आहेत़ प्रशासनाने याकडे लक्ष देत कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.

सोन्याळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर अशोक राठोड यांची बदली झाल्याने  सदरची जागा रिक्त झाली आहे. 






यामुळे येथील दवाखान्याचा कार्यभार उमदी येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे,पण तेही येथे येत नाहीत़.उमदी येथील या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे उमदीसह बोर्गी दवाखान्याचा अतिरिक्त कार्यभार आहे.त्यामुळे त्याच्यावर अगोदरच कामाचा मोठा ताण आहे.तरीही सोन्याळचा कार्यभार त्याच्यांवर लादण्यात आला आहे. पशुसंवर्धन खात्याच्या या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून पशुधन बाळगणाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.कायमस्वरूपी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी मिळविण्यासाठी अजून किती महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



Rate Card




येथे एक पशुवैद्यकीय अधिकारी, एक पशुधन विकास अधिकारी, दोन परिचर, एक वनोपचारक अशी पदे‌ मंजूर आहेत. मात्र सद्यस्थितीत या दवाखान्यात एक प्रभारी परिचर (शिपाई) असून त्यालाही माडग्याळ आणि सोन्याळ अशा दोन्ही दवाखान्याचे काम पाहण्यास सांगितले आहे. 






खाजगी डॉक्टरांचे महागडे उपचार घेण्याची वेळ


सोन्याळ,लकडेवाडी,जाडरबोबलाद गावामध्ये दुधाळ गायीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे सोबतच गायी, म्हैस, खिलार गायी, शेळी, मेंढी यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या ठिकाणी जनावरांना अचानक काही झाल्यास कोणताही सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक जनावरे दगवलेची घटना घडल्या आहेत आणि शेतकरी वर्गांचे खूप मोठे नुकसान होत आहे.

सरकारी नियमानुसार जनावरांचे उपचार केल्यास निश्चितच शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जनावरांना उपचार घेता येतात.परिसरात दररोज साधारण दहा हजारहुन अधिक लिटर दुधाचे संकलन होत आहे व इतर लहान-मोठी जनावरे वेगळीच आहेत एवढी मोठी संख्या जनावराचे आरोग्य डॉक्टर नसल्याने धोक्यात आले आहे.



सोन्याळ ता.जत येथे कुलूप बंद असलेला पशूवैद्यकीय दवाखाना

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.