आठवडे बाजारात मोबाईल चोर सक्रिय

0जत, का.प्रतिनिधी : जत तालूक्यातील अनेक गावातील व शहरातील आठवडी बाजारामध्ये मोबाईल चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीला रोखण्यासाठी पोलिसांना अपयश येत आहे.तर लोकांनी अशा एकाद्या मोबाइल चोरट्याला पकडून दिल्यास त्याला एकतर असेच सोडून दिले जाते.किंवा जुजबी कारवाई करण्यात येत आहे.त्यामुळे चोरट्याचे मनोबल वाढले आहे.
बाजारामध्ये दिवसेंदिवस चोर्‍या वाढलेल्या असतानाही मोबाईल चोरट्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चोरटे आठवडी बाजारात भाजी खरेदीच्या घाईत नागरिक असताना हे चोरटे चालाखीने हातसफाई करुन महागडे मोबाईल पळवत आहेत.

Rate Card
जत येथील आठवडी बाजार गुरूवार, मंगळवार असा दोन दिवशी शहरातील वेगवेगळ्या भागात भरतो. या आठवडी बाजारात भाजीपाला व इतर जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत त्यांचे मोबाईल चोरणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. जत तालूक्यातील इतर माडग्याळ,उमदी,डफळापूर,संख, शेगाव,बिंळूर,कुंभारी आदि गावातील दर आठवडी बाजारात मोबाईल चोरीला जाण्याची घटना सातत्याने घडत आहे. आजपर्यंत शहरातील शेकडो रहिवाशांना मोबाईल चोरीचा सामना करावा लागला. या संदर्भात पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी जाणार्‍या नागरिकांना प्रश्नांचा भडीमार करून गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या नागरिकाच्या तक्रारी आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकार सातत्याने घडत असूनही या संदर्भात पोलिस प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष सामान्य नागरिकांना भुर्दंड ठरणारे आहे.
चोरट्याची हिंमत वाढत असून अशा घटना दिवसेनदिवस वाढतच आहेत. याबाबतची खबरदारी घेऊन पोलिसानी प्रत्येक गावातील आठवडी बाजारात पोलिस ठेवावेत अशी मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.