जतच्या पाणीप्रश्न राष्ट्रवादी कॉग्रेसच सोडविणार ; अँड.बाबासाहेब मुळिक | जतेत कार्यालयाचे उद्घाटन

0
5



जत,प्रतिनिधी : जत तालुका हा स्वर्गीय राजारामबापू यांच्या विचारांना मानणारा तालुका आहे.बापू महसूलमंत्री असताना खूजगाव धरणातून जत तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या उमदीपर्यंत पाणी देण्याचे त्यांचे स्वप्न व ध्येय होते.मात्र त्यावेळी खूजगावऐवजी धरण  चांदोलीला करण्याचा घाट घातला गेल्याने पाणी मिळू शकले नाही.तीस वर्षे झाली तरीही अद्याप तालुक्याचा पूर्व व काही भाग पाण्यापासून वंचीत आहे.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आता सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी जलसंपदा हे खाते मिळाल्याने येणाऱ्या काळात तालुक्याचा पाणीप्रश्न सुटणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याअध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केले.










जत शहरातील शिवाजी पेठेतील दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी अँव्होकेट मुळीक बोलत होते.यावेळी जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भरत देशमुख, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जिल्हा युवती अध्यक्ष पुजाताई लाड,कुंडल शहर अध्यक्ष वैष्णवी जंगम,जत बाजार समितीचे सभापती दयगोंडा बिराजदार,बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे,माजी उपसभापती शिवाजी शिंदे,अँड बसवराज धोडमनी,अँड.चन्नप्पा होर्तीकर,माजी जि.प.सदस्य रमेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर  खतीब,जे के माळी,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण,युवक जिल्हा उपाध्यक्ष अशोक कोळी,राष्ट्रवादी तालुका विद्यार्थी अध्यक्ष पवन कोळी ,तालुका उपाध्यक्ष फिरोज मुल्ला,सिद्धपा शिरसाड, किरण बिजर्गी, संतोष शिरसाड, चेतन दुगाणी, हेमंत खाडे ,जयंत भोसले,सागर चंदनशिवे,आदी उपस्थित होते.










यावेळी अँडव्होकेट मुळीक म्हणाले की, जलसंपदा खाते हे जयंत पाटील यांनी मुद्दामहून दुष्काळी योजनेच्या पाणी योजना पूर्ण करण्यासाठी घेतले आहे. लवकरच ते जत तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवतील असा विश्वास मुळीक यांनी व्यक्त केला.यावेळी भरत देशमुख म्हणाले की,जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जत तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न सुटावेत.तालुक्याचा पाणीप्रश्न  जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नक्कीच सोडवतील अशी अपेक्षा व्यक्त केली.










राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांची तुफान टोलेबाजी

बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांनी तुफान टोलेबाजी करत जतच्या पूर्व भागाच्या पाणीप्रश्नासाठी हिरे-पडसलगी योजनेतून पाणी देतो असे सांगत फसवणूकीचा उद्योग करत असल्याचे सांगत आमदार विक्रमसिंह सावंत यांचे नाव न घेता टोला लगावला.विस्तारित म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी देण्याचे स्वप्न जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आहे.पक्षातील अंतर्गत विरोधकांना फटकारत चारजण एकत्र आले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे.गटबाजी सोडून तालुक्यात राष्ट्रवादी वाढविण्यासाठी प्रयत्न करु या.मी यापुढे राष्ट्रवादी  काँग्रेस पक्ष।कदापिही सोडणार नाही.पक्ष सोडला तर मी राजकारण सोडेन असे शिंदे म्हणाले.स्वागत धोडमणी यांनी मानले तर आभार उत्तमशेठ चव्हाण यांनी मानले.






जत,येथील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करताना जिल्हाध्यक्ष अँड.बाबासाहेब मुळिक व मान्यवर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here