एसटीची बससेवा ग्रामीण भागात सुुरू करा ; दिग्विजय चव्हाण

0
9



जत,प्रतिनिधी : राज्य परिवहन महामंडळाची एसटी बसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर बंद असलेली जत तालुक्यातील ग्रामीण भागातील बससेवा सुरू करावी,अशी मागणी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी केली आहे.

सद्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना शहरात येण्यासाठी आणि शहरातून आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी एसटी महामंडळाने ग्रामीण भागात एसटीची बससेवा सुरू करण्याची गरज आहे. 

मोठा विस्तार असलेल्या जत तालुक्यात एसटी बसेसचे मोठे जाळे आहे.










अनेक गावे शहरापासून साठ- सत्तर किलोमीटर अंतरावर आहे.तेथून जत व गावी येण्यासाठी मुक्कामी,व दिवसभरातील एसटीच्या फेऱ्या सुरू होत्या.कोरोनामुळे त्या फेऱ्या बंद असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना धोका पत्करून खासगी वाहनावर अवलंबून रहावे लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा ग्रामीण भागात बंद असल्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहेत.










सणासुदीच्या दिवस असल्याने जत आगाराने तालुक्यातील बंद असलेल्या सर्वत्र बससेवा सुरू करून प्रवाशांना ये-जा करण्यासाठी सोय उपलब्ध करावी,असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.तशा मागणीचे त्यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन ही दिले आहे.


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here