जत,प्रतिनिधी : साडेतीन मुहूर्तपैकी एक असलेला दसरा पारंपारिकरित्या उत्साहात साजरा करण्यात आला.एकमेकांना आपट्यांची पाने देऊन नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी नसली तरी व्यवसायाला बऱ्यापैकी चालना मिळाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
कापड, वाहन क्षेत्रातही समाधानकारक व्यवहार झाले. मिठाईच्या दुकानातून मिठाई घेऊन नागरिकांनी दसरा गोड साजरा केला.विशेष म्हणजे वाहन व्यवसायात कार,मॉल या ठिकाणी देखील जुनी वाहने खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती. तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी आपट्यांची पाने विकण्यासाठी नागरिक व्यवसाय करीत होती.व्यावसायिकांत उत्साह गेल्या सहा ते सात महिन्यापासून कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांनी दसरा उत्साहात साजरा केला. लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या व्यवसायाला यामुळे चालना मिळाली. नागरिकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर विविध वस्तूची खरेदी केल्याने व्यावसायिक वर्गाने समाधान व्यक्त केले.
जत तालुका संस्थानिक तालुका असल्याने अनेक गावात ऐतिहासिक वस्तु,पुजा करण्यात येतात.यंदा अपवाद वगळता ऐतिहासिक दसऱ्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.साधेपणाने सर्वत्र आनंद लुटण्यात आला.
झेंडूची फुले महागली
दसऱ्याला झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. बाजारात उच्च दर्जाचा झेंडू महागला असून एक किलो 300 ते 400 रूपयाला विकत असतांना पाहायला मिळत होती. आपले घर,वाहन, गाड्या इ.ची पुजा करून ग्रामीण भागात दसरा कोरोनाच्या सावटाखाली साजरा झाला. परंतु कोरोनामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण कमी प्रमाणात दिसून आले.
येळवी ता.जत येथे ऐतिहासिकतलावारीची मिरवणूक काढत पुजा करण्यात आली.







