कोसारीत जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी

0
6



जत,प्रतिनिधी : कोसारी ता.जत येथे वडिलार्जित जमिनीच्या वादातून दोन गटात झालेल्या तुंबळ मारहाणीत पाच जण जखमी झाले आहेत.याप्रकरणी दोन्ही बाजूच्या परस्पर विरोधी तक्रारी जत पोलीसात दाखल झाल्या आहेत.

अधिक माहिती अशी,कोसारी येथे पाटील कुंटुबियांची वडिलार्जित जमीन आहे.या जमिनीचा चुलत भाऊ असलेल्या दोघात वाद आहे.त्या वादातून गुरूवारी ता.22 ला सायकांळी दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली.दोन्ही गटाकडून लोंखडी रॉड,काठीने मारहाण करण्यात आली.दोन्ही गटाचे पाच जण यात जखमी झाले आहेत.







रमेश चंदर पाटील यांनी बापू भगवान पाटील,फलाबाई भगवान पाटील यांच्या विरोधात तर बापू भगवान पाटील यांनी मोहन चंदर पाटील,रमेश चंदर पाटील,बसाप्पा चंदर पाटील यांच्याविरोधात फिर्यादी दिल्या आहेत.अद्याप कोणासही अटक करण्यात आलेले नाही.अधिक तपास कॉन्टेबल थोरात व हाक्के करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here