जतेत अस्वच्छता,नागरिकांचे आरोग्य धोक्यात | तातडीने सुविधा द्या : मानवाधिकार संघटनेचे निवेदन

0जत,प्रतिनिधी: जत शहरांमधील रस्ते, गटारी यांची दुरावस्था झाल्याने अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तातडीने प्राथमिक प्रश्न असलेले स्वच्छता, रस्ते दुरूस्ती करावी अशी मागणी, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ,दिल्ली शाखा जत यांच्या वतीने करण्यात आला आहे. तसे निवेदन मुख्याधिकारी मनोज देसाई यांना देण्यात आले आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष सुभाष वाघमोडे,सचिव गणेश भिसे, उपाध्यक्ष के.अजित कुमार,विकास भोसले उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, जत नगरपरिषदेची निवडणूक होऊन जवळपास तीन वर्ष संपत आली तरीही 

सत्ताधारी व नगरपरिषद प्रशासन रस्ते,गटारी,स्वच्छता, विज अशा प्राथमिक सुविधा देण्यात अपयश आले आहे.

सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे प्रभाग क्रमांक दहामध्ये आजपर्यंत कोणतीही सुधारणा झालेली नाही. रस्ते, गटारी,झोपडपट्टीचा प्रश्‍न,पिण्याचे पाणी,अस्वच्छता आदी समस्या जीवघेण्या ठरल्या आहेत.शंकर कॉलनीजवळ उमराणी रोडनजीक  रस्त्याची चाळण झाली आहे.

Rate Cardतर  छत्रीबागरोड भागात माळी वस्ती येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच विजेचाही सातत्याने लपंडावाचा सुरू असतो.नगरपरिषदेचा हा प्रकार आंधळं दळतं कुत्र पिठ खातयं अस झाला आहे.

या भागात निवडून आलेले पदाधिकारी लक्ष देत नाहीत,प्रशासनही याकडे गांर्भिर्याने घेत नसल्याने नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.नगरपरिषदेने तातडीने येथे सुविधा द्याव्यात,अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही निवेदनात दिला आहे.

 

जत शहरातील प्रभाग 10 मधील वास्तविकता दर्शवणारी छायाचित्रे

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.