डफळापूर-अंकले रस्ता तडकला

0डफळापूर,वार्ताहर : डफळापूर-अंकले या नव्यान केलेल्या रस्त्याला तडे गेले आहेत.त्याशिवाय रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले,असून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.या कामाची गुण नियंत्रण विभागाकडून चौकशी करावी,अशी मागणी ग्रा.पं.सदस्य देवदास पाटील यांनी केली आहे.
डफळापूर पासून भोकरचंवडी तलावापासून जाणाऱ्या रस्त्याचे अनेक दिवसानंतर डांबरीकरण काही महिन्यापुर्वी करण्यात आले आहे.मुळात आम्ही सातत्याने रस्त्याच्या निकृष्ठ कामाबाबत तक्रारी केल्या.मात्र भष्ट्र अधिकाऱ्यांच्या साखळी,ठेकेदार यांच्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट झालेच.ते अल्पजीवी ठरले असून काही महिन्यापुर्वी केलेला हा रस्ता अनेक ठिकाणी दबला आहे.
Rate Card

डांबरीकरण तडकल्याने चिरा पडल्या आहेत.अनेक ठिकाणी या चिरातील डांबरीकरण निघून गेल्याने खड्डे पडले आहेत.या प्रकाराला जतचा बांधकाम विभाग कारणीभूत असून रास्ता कामाची गुणनियत्रंक विभागाने तपासणी करावी,अन्यथा आंदोलन करू असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.डफळापूर- अंकले नव्याने केलेला डांबरीकरण रस्ता तडकला आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.