जत शहरातील रस्त्याची तातडीने दुरूस्ती करा | प्रांताधिकारी यांना निवेदन

0जत,प्रतिनिधी : जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते आरळी कॉर्नर रस्त्यावरील खड्डे तातडीने मुजवावेत अशी मागणी युवा नेते योगेश मोटे यांनी केली आहे.तसे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे.जत शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या आरळी

आरळी कॉर्नर, छत्रपती संभाजी चौक ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापर्यत रस्त्यावरील खड्ड्यामुळे चालताही येत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.


Rate Cardया रस्त्यावर तहसीलदार,प्रांताधिकारी,

पंचायत समिती,पोलीस ठाणे अशी महत्वाची शासकीय कार्यालये आहेत.नेमका हा रस्ता पांणद रस्ता बनला आहे.कोणते खड्डे चुकवायचे असा प्रश्न दुचाकी,चारचाकी वाहन धारकासमोर उपस्थित होत आहे.त्यात जत रिमझिम पाऊस झाला तर मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या खड्ड्यामुळे सातत्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत.त्यामुळे तातडीने या रस्त्याचे दुरूस्ती करावी,अन्यथा रास्ता रोको करू असा इशारा निवेदनात दिला आहे.किरण शिंदे,युवा नेते नितीन सनदी, डॉ.प्रवीण वाघमोडे, सचिन कुकडे,राहुल मालानी, विशाल कांबळे, प्रमोद ऐवळे, श्रीनिवास बुरुटे,अश्विन हुवाळे, बाळासाहेब सावंत,हणमंत शिंदे,अरुण धोडमणी,अनंत कुकडे आदी उपस्थित होते.

       

जत शहरातील रस्त्याची दुरूस्ती करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.