श्रीसंत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या कार्य अभिमानास्पद ; राजू शेट्टी

0जत,प्रतिनिधी : जतसारख्या दुष्काळी भागात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी अडचणीत आला की त्याच्या मदतीसाठी चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या कल्पनेतून साकारलेली श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना ही धावू@न जाते, त्यांना मानसिक धीर देण्याबरोबरच त्यांना जमेल ते अर्थसाह्य करते ही खूप मोठी गोष्ट आहे. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या जतमधील श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे कार्य अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.


चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज हे अचकनहळळी येथे जावून विनायक शिंदे यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा, माजी खासदार राजू शेट्टी हे शिंदे कुटूंबियांची भेट घेण्यास आले होते. 

या भेटी दरम्यान श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने शेतकरी विनायक शिंदे यांना आर्थिक मदत करण्यात आली. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेची ही मदत राजू शेट्टी यांच्या हस्ते शेतकरी शिंदे यांना देण्यात आली.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, रमेश माळी, आबा गावडे ,पिंटू मोरे , शहाजी साळे, सुधीर माळी, भैरव माळी, शिवाजी पाटील , दामाजी दुबळ, सूरज पाटील , महेश जगताप, निखिल कारंडे, मारुती देवकर, सुरेश पाचिब्रे, प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते. Rate Cardपाण्यासाठीच्या लढयात शेट्टीही होणार सहभागी


जत पूर्व भागाला पाणी मिळाले पाहिजे, हा भाग सधन झाला पाहिजे यासाठी तुकाराम बाबा महाराज यांनी निस्वार्थपणे जो लढा सुरू केला आहे त्याला तोड नाही. तुकाराम बाबा महाराज यांनी जतला पाणी मिळावे यासाठी पाणी परिषद, मेळावेच नव्हे,पायी पदयात्रा काढत शासनाचे लक्ष वेधून घेतले. लोकसहभागातून कालवा, पाइपलाईनचे काम करून काही गावांना पाणी नेण्याचीही तयारी त्यांनी दाखवली आहे. पाण्यासाठी तुकाराम बाबांच्या लढ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी होणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
अचकनहळळी येथील शिंदे कुटूंबियांना मानव मित्र संघटनेकडूनची मदत देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी,तुकाराम बाबा

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.