इस्लामपूर येथे 14 लाखाचा गांजा जप्त,दोघांना अटक

0



शिराळा,प्रतिनिधी : वाळवा तालुक्‍यातील पेठ व तांदूळवाडी येथे इस्लामपूर पोलिसांनी छापा टाकून घरात साठा केलेला गांजा व दोन मोबाईल असा तब्बल 13 लाख 69 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सुदाम काकासो बाबर (वय 50, रा. पेठ) व संतोष संभाजी तोडकर (वय 42, रा. तांदूळवाडी) या दोघांना पोलिसांनी अटक केली. दोघांविरूद्ध हवालदार उत्तम माळी यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी पेठ येथील सुदाम बाबर हा विनापरवाना गांजा विक्री करत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पेठ येथे बाबरच्या घराला वेढा देऊन छापा टाकला. बाबर याच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्याच्या घणात 4 किलो 50 ग्रॅम वजनाचा 32 हजार रुपये किमतीचा गांजा मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला. त्याच्याकडे गांजा कोठून आणला, याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने तांदूळवाडी येथून संतोष तोडकर याच्याकडून गांजा आणत असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी तांदूळवाडी येथे तोडकरच्या घरावर छापा टाकला.

Rate Card

तेव्हा तोडकरच्या घरात तब्बल 166 किलो 11 ग्रॅम वजनाचा 13 लाख 28 हजार 880 रुपये किमतीचा गांजा मिळून आला. पोलिसांनी तो देखील जप्त केला. गांजा विक्रीप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दोघांकडून दोन मोबाईलसह 13 लाख 69 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश भरते, प्रशांत देसाई, अमोल भिंगारदेवे, मिनाक्षी माळी, उमाजी राजगे यांच्या पथकाने कारवाईत भाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.