उमदीत कृषी उत्पादक मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

0उमदी,वार्ताहर : उमदी (ता.जत) येथे जत तालुका कृषी उत्पादक मंडळ कार्यालयाचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण माने,अप्पर तहसीलदार म्हात्रे, लखन माने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की,जत तालुक्यात जत तालुका कृषी उत्पादक मंडळ मर्यादित आणि एम.सी.एल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बायो-सीएनजी व सेंद्रिय खते निर्मितीच्या प्रकल्प आमच्या जत तालुक्यात उभारण्यात येत असल्याने अनेकांना रोजगार उपलब्ध होईल तसेच शेतकऱ्यांना देखील यांचा फायदा होणार असुन तालुका प्रदूषण मुक्त होईल. संबंधित कंपणी व यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वाचे मी तालुक्याच्या वतीने आभार आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मानले.

यावेळी श्रावण माने यांनी मुख्यत: सदर प्रकल्प हा शेतातील टाकाऊ कचरा, गावातील घन कचरा, हत्ती गवत किंवा गिनिगोल गवत या पासून जैविक गॅस व सेंद्रीय खत निर्मिती होणार आहे. नेपिअर गवताच्या पिकासाठी कमीत-कमी पाणी, कमी देखबाल तसेच कोणत्याही प्रकारची जमीन व 3-4 वर्षे उत्पादन देणारे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहकार्यातून आर्थिक आणि समाज उन्नती होणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे ते म्हणाले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, तालुका कृषी अधिकारी सुनील सातपुते, संरपंच वर्षा निवृत्ती शिंदे, उपसरपंच रमेश हळके, सुनील पोतदार, आर.डी.सातपुते, डॉ.एल.बी.लोणी आदी मान्यवर उपस्थित होते.

Rate Card

उमदी ता.जत कृषी उत्पादक मंडळ कार्यालयाचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.