माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ ता.जत येथे माझे कुंटुब माझी जबाबदारी मोहिमेअतर्गंत नो मास्क नो माल,मास्क नाही,प्रवेश नाही मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सा.पो.निरिक्षक दत्तात्रय कोळेकर उपस्थित होते.
जत पुर्व भागातील 35 गावात ही मोहिम राबविण्यात आली आहे.प्रत्येक दुकान,सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. त्याशिवाय कोठेही गर्दी होणार नाही,यांचीही काळजी घेण्यात आली आहे. या मोहिमेचा फायदा कोरोना रुग्ण कमी होण्यास मदत झाली आहे.
गावागावातील दुकानदार,लोकप्रतिनिधीच्यात जागृत्ती करत या मोहिमेला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले होते.त्याला सर्वच गावात प्रतिसाद मिळत असल्याचे सा.पो.नि.कोळेकर यांनी सांगितले.
माडग्याळ ता.जत येथील ग्रामीण रुग्णालयासमोर पोलीलाकडून जनजागृत्ती करण्यात येत आहे.








