जत तालुक्याला खड्ड्यांत कोणी ढकलले? | साखळीने रस्त्याची वाट ; कुठल्याच रस्ता विना खड्ड्याचा राहिला नाही

0

 

 
जत,प्रतिनिधी :जतमध्ये सध्या एकच विषय चर्चेमध्ये आहे. तो म्हणजे खड्ड्यांचा.तसे राज्यातील सर्वच शहरांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत; पण जतमधील खड्डे वेगळे आहेत.  रस्त्यांवर अधूनमधून खड्डे पडतात. ते बुजविले जातात,डांबरीकरण केले जाते. पावसाळा आला की मात्र गोष्ट वेगळी असते. पहिल्या पावसाने रस्त्यांवरील धूळ निघून जाते. दुसऱ्या पावसाने खड्यामध्ये भरलेला मुरूम आणि डांबर बाहेर येऊ लागते.
त्यात पाऊस दररोज पडत राहिला, तर मात्र खड्डे मोठे व्हायला लागतात. चार पाच दिवसांच्या पावसाने हे खड्डे चांगले मोठे होऊ लागतात. रस्त्यांवर खड्डे पडले की आरडाओरडा सुरू होतो.अनेक लोकप्रतिनिधी, विभागाच्या सभेमध्ये आरडाओरडा होतो. नेहमीप्रमाणे तातडीने खड्डे बुजविले जातील, असे जाहीर करतात. त्यांनी दिलेली मुदत कधीच पाळली जात नाही; कारण पाऊस पडतच राहतो.पावसाने उघडीप दिली तरच खड्डे बुजविले जातील, असे सांगण्यात येते.
पावसाळा संपेपर्यंत असाच खेळ सुरू राहतो. त्यानंतर तातडीने निविदा निघतात.तालुकाभर रस्त्यांवर डांबरमिश्रीत खडीचे थरच्या थर चढविले जातात. खड्डे गायब होतात. चर्चा थांबते. अर्थात हे खड्डे कायम स्वरूपी कधीच गायब होत नाहीत; कारण डांबराचे थर चढविताने 
गटारी कधीच लेव्हलमध्ये आणली जात नाहीत.कधी ती रस्त्याच्या पातळीच्या खाली असतात तर कधी वर.काही ठिकाणी गटारीच नसतात.यंदातर या सर्वावर कहर केला असून नव्याने गेल्या काही महिन्यात केलेले डांबरीकरणाचे एकही रस्ते मजबूत राहिलेले नाहीत.सर्वच रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

काही ठिकाणच्या ओढापात्रातील सीडीवर्क,पुलाचे अवशेष वाहून गेले आहेत.अनेक रस्त्यावरून थेट नाले वाहू लागल्याने रस्ते वाहून गेले आहे.टेलिफोन कंपन्या आणि पालिकेचे पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभाग अधूनमधून रस्ते खणतच असतात. बरे हे खड्डे एका बाजूला नसतात, तर संपूर्ण रुंदीत असतात. त्यावर कधी तरी खडी टाकली जाते; पण हे खड्डे रस्त्यावरील स्मूथ राइडचा अनुभव कायमचा किरकिरा करून टाकतात.

गेले काही वर्षी तर खूपच कमी पडला. त्यामुळे जतच्या रस्त्यांवर फार मोठे खड्डे पडले नाहीत. दुष्काळाचा असाही फायदा; पण त्याचा फटका आता बसतो आहे. कारण या कालावधीमध्ये रस्त्यांकडे पाहिजे तसे लक्षच दिले गेले नाही. या रस्त्यांच्या देखभाल व दुरूस्ती हवी तशी झाली नाही. यंदा मात्र पावसाने विश्रांतीच घेतली नाही आणि बघता बघता जत तालुका खड्ड्यात गेला आहे.


हे असे का होते? हे खरोखरच घडते की जाणीवपूर्वक घडविले जाते? अनेक देशांमध्ये रोज पाऊस पडतो, पण तिथले रस्त्यांवर कधीच खड्डे पडत नाहीत; मग आपल्या शहरातील,गावातील रस्त्यावर एवढे खड्डे का पडतात असे प्रश्न आपल्यासारख्या सामान्यांना कायमच पडतात. मात्र, त्याची उत्तरे कधीच समाधानकारक मिळत नाहीत. इतर देशातील रस्त्यांची निर्मिती व्हायला हवी होती; पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एवढे हुशार की नव्या रस्त्याची अशी काही वाट लावली की त्यावरही आता खड्डे पडले! त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निकृष्ठ शेकडो तक्रारी येऊनही रस्ता गुणवत्तापुर्ण असल्याचे प्रमाणपत्र देतात.यामुळे साहजिकच खड्डा होण्यासारखी परिस्थिती निर्माण केली जाते.Rate Cardइतर रस्त्यांची स्थिती तशीच आहे. निविदा काढताना या रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत याची हमी कॉन्ट्रक्टरकडून घेतली जाते.मात्र नव्या रस्त्यावर कोणाची परवानगी न घेताच आठ पंधरा दिवसांमध्ये लगेच पाण्याची लाइन टाकण्यासाठी काहीजणाकडून हा रस्ता खणला जातो.कधी पाणी आणि टेलिफोन कंपन्या घेतात; पण रस्ता खणला जातोच.हे सगळे एक दुष्टचक्र आहे.त्यामध्ये एकदा सापडले की सुटका नाही.

रस्तांचे डांबरीकरण करण्याची निविदा मिळविण्याची स्पर्धा मोठी आहे. त्यामुळे प्रशासनाकडून तयार केल्या जाणाऱ्या एस्टिमेटपेक्षा प्रसंगी पाच ते दहा टक्के कमी दर आकारून काम मिळविले जाते. त्यानंतर त्यामध्ये अनेक वाटेकरी असतात.

या साखळीला पैसे वाटण्यातच किमान 25 ते 30 टक्के रक्कम काम सुरू करण्याच्या आधीच वाटण्यामध्ये संपली जाते,अशी चर्चा असते.त्यांनतर उरलेल्या रकमेत त्याला आपला फायदा कमवायचा असतो. साहजिकच रस्ता काय दर्जाचा होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. या सगळ्यांमुळे रस्ता तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खडी, डांबरापासून सगळ्याच बाबींच्या दर्जामध्ये अडचण येते. अनेकदा रस्त्यावर देण्याचा थर कमी जाडीचा दिला जातो. अनेकदा वापरले जाणारे मिश्रण हे पुरेशा तापमानाचे नसते. त्याला काय होते, असा अँप्रोच ठेवून रस्ता केला जातो. हाच रस्ता घात करतो.

रस्त्याच्या दोन्ही टोकांपर्यंत डांबरीकरण व्हायला हवे. कडेला पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी पावसाळी गटारे पाहिजेत किंवा सिमेंटने पन्हाळीसारखा आकार करायला हवा, असे अभियांत्रिकी शास्त्र सांगते. पाणी आणि डांबर हे एकमेकाचे शत्रू असल्याचेही शास्त्र सांगते. मग नक्की हे रस्ता करणाऱ्यांना का उमगत नाही.
पाऊस आला की दरवेळेस कॉन्ट्रक्टरवर कारवाईची भाषा होते. क्वचित प्रसंगी लहान अधिकाऱ्यावरही कारवाई होते; पण ती क्वचितच. कारण खरे खड्डे का पडतात याची माहिती सगळ्यांनाच असते. त्या उत्तरातच कोणी खड्ड्यात घातले याचेही उत्तर दडलेले असते. कोणाच्या तरी काळात कमी खड्ड्यात जाते, तर कोणाच्या तरी काळात जास्त. आता प्रश्न एवढाच की  जतकर खड्डे विसरणार की लक्षात ठेवणार?

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.