बसाप्पावाडी तलाव सलग दुसऱ्यावर्षी ओव्हरफ्लो

0डफळापूर, वार्ताहर : अंकले ता.जत येथील बसाप्पावाडी मध्यम गेल्या दहा दिवसातील पावसाने ओव्हरफ्लो झाला असून रवीवारी रात्रीपासून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.बावीस वर्षानंतर गतवर्षी हा तलाव भरला होता.आता सलग दुसऱ्यावर्षीही तलाव भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. या तलावातून डफळापूर, नांगोळे गावाच्या पाणीपुरवठा पाईपलाईन आहेत.
त्याशिवाय अंकले,बाज,बसाप्पावाडी,मोघमवाडी,इरळी,डोर्ली या गावातील शेतकऱ्यांना यांचा फायदा होतो आहे.

सर्वात मोठा मध्यम प्रकल्प असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साठा या तलावात झाला आहे.गतवर्षापासून म्हैसाळ व टेंभू योजनेचे पाणीही या तलावात सोडण्यात येत आहे.त्याशिवाय गेल्या दहा दिवासातील तूफान पावसामुळे तलाव शंभर टक्के भरला आहे.
पाणीप्रश्न सुटला


बसाप्पावाडी मध्यम 100 टक्के भरल्याने

Rate Card

अंकलेसह,बाज, डोर्ली परिसरातील जमिनीतील पाणी पातळी वाढणार आहे.त्याशिवाय माझ्या मतदार संघातील मोठे गाव असणाऱ्या डफळापूरचा पाणी प्रश्न यामुळे सुटणार आहे.डफळापूरच्या पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.लवकरच या योजनेतून पाणी सोडण्यात येणार आहे.महादेव पाटील,सदस्य जि.प.सांगली

बसाप्पावाडी ता.कवटेमहांकाळ येथील मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.