विक्रम ढोणेनी पात्रता ओळखून आरोप करावेत ; शिवसेना नेत्याची टिका

0

जत,प्रतिनिधी : मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी धनगर समाजाच्या आरक्षण व विविध मागण्याबाबत धनगर समाजाच्या शिष्टमंडळ समवेत झालेल्या बैठकीत धनगर समाजाच्या आर्थिक विकासाच्या व अन्य मागण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील तसेच आरक्षणासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यासाठी कायदे

तज्ञ्याशी व विविध घटकांशी समन्वय साधून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.


त्याचप्रमाणे समाजाच्या विकासासाठीच्या योजनांच्या आर्थिक तरतुदी बाबत निश्रित सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याने धनगर समाजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेच सोडवू शकतात असा ठाम विश्वास असल्यानेच धनगर समाजाचे राज्याचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय

भरणे,माजी आमदार अनिल गोटे,माजी मंत्री आण्णा डांगे,माजी आमदार रमेश शेंडगे,माजी आमदार रामराव वडकुते याचबरोबर राज्यातील धनगर समाज्याचे अनेक प्रमुख नेत्यासोबत बैठक झाली आहे.


या बैठकीचा चुकीचा अर्थ काढून धनगर विवेक जागृत्तीचे नेते विक्रम ढोणे यांनी मुख्यमंत्री व शेंडगे यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहे.यापुढे त्यांनी असे आरोप करताना भान बाळगावे,अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख तम्मा कुलाळ,युवा सेनेचे तालुकाप्रमुख नागनाथ मोटे,तालुका उपप्रमुख श्रींमत करपे यांनी बैठकीत केले.


Rate Card

बैठकीत कुलाळ,मोटे,करपे पुढे म्हणाले, वास्तविक पाहता टीकाकारांना माहिती नाही काय?धनगर समाज्याकरिता गेल्या वीस तीस वर्षापासून कै.शिवाजीराव बापू शेंडगे यांच्या घराण्याचे योगदान फार मोठे आहे.कै.शिवाजीराव शेंडगे यांनी तत्कालीन राज्यशासनास धनगर समाज्याला एनटी सी च्या सवलती लागू करण्यास भाग पाडले.यामुळे धनगर समाज्याच्या असंख्य विद्यार्थ्यांना,सुशिक्षित बेरोजगारांना, गोरगरीब मेंढपाळांना फायदा झाला.त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचे चिरंजीव माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचे धनगर समाज चळवळीत मोठे योगदान आहे,तसेच प्रकाश शेंडगे राज्याचे नेते आहेत.

त्यांच्यावर शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर टिका करताना ढोणे यांनी आपली मर्यादा,पात्रता ओळखून टिका करावी.दररोज वर्तमान पत्रातून धनगर समाजाच्या राज्याच्या नेत्यावर टीका

करण्याचा ठेका त्यांनी घेतला आहे काय ? त्यांनी स्वत:च्या पात्रतेचे आत्मपरीक्षण करावे.धनगर समाजाचा प्रश्न मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व शिवसेना पक्षच सोडवू शकतो याचा समाज्याला ठाम विश्वास असल्यानेच धनगर समाज्याने शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहावे असे आम्ही आवाहनही कुलाळ,मोटे,करपे यांनी केले.
shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.