राजकीय कार्यकर्ते बनले ठेकेदार | जत तालुक्यातील प्रकार | गुणात्मक दर्जा गरजेचा : विक्रम ढोणेची मागणू

0



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सर्व विभागातील अनेक विकासकामात राजकीय कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढला असून कागदोपत्री ठेकेदार वेगळा तर 

प्रत्यक्षात काम करणारा वेगळा असा प्रकार सध्या जत तालुक्यात सुरू आहे. कोणाताही अनुभव व साहित्य नसलेले अनेक स्वंयघोषित कार्यकर्ते तयार झाले आहेत.ते ठेकेदार बनून कामे घेत आहेत.

यामुळे कामाचा दर्जा खालावला आहे.अशा ठेकेदारांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.  





तालुक्यातील पंचायत समिती,

कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,नगर परिषद,ग्रामपंचायतीकडून अनेक विकास कामे होत आहेत.यातील अनेक कामे राजकीय दबावामुळे अशा स्वंयघोषित राजकीय ठेकेदारांनी घेतली आहेत.यात मुख्य ठेकेदार फक्त नाममात्र ठरत असून काही ठराविक रक्कम त्यांना देत विना अनभुवी राजकीय ठेकेदार दर्जाहीन कामे करत शासनाच्या निधीवर डल्ला मारत आहेत.









 तालुक्यातील अनेक विभागात हे राजकीय कार्यकर्ते ठेकेदार म्हणून वावरत आहेत.यापुर्वीच्या सत्तेतील चेहरे बदलेले दिसत आहेत.मात्र ठेकेदारीला ऊत आल्याचे स्पष्ट होत आहे.

Rate Card

अधिकृत ठेकेदारांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे कारण राजकीय दबावापुढे त्यांचा टिकाव लागत नाही तसेच कामाचा गुणात्मक दर्जा ढासळला जात आहे.





या ठेकेदारांना दर्जाबाबत अधिकाऱ्यांनी नियम लावले तर अधिकाऱ्यावर सुद्धा राजकीय दबाव टाकला जातो,यामुळे अधिकाऱ्यांची अवस्था सांगता ही येईना आणि सहनही होईना अशी झाली आहे. काही अधिकाऱ्यांनी तर ठेकेदारांच्या नावावर स्व:ता कामे घेत उथळ पांढरे केल्याची चर्चा आहे.






गुणात्मक दर्जा गरजेचे


जत तालुक्यात विकास कामे होणे गरजेचे आहे.मात्र राजकीय दबावामुळे दर्जा घसरता कामा नाही.अधिकारी,संबधित यंत्रणांनी यात गंभीरपणे लक्ष घालावे.वरिष्ठ नेत्यांनी अशा प्रकाराला पायबंध घालण्याची गरज आहे.


विक्रम ढोणे,युवक नेते

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.