जतसह पंचक्रोशीतील कोरोना रुग्णासाठी ‘जत कोविड हॉस्पिटल’ ठरतय वरदान

0



     प्रतिकात्मक छा़याचित्र



जत,प्रतिनिधी : कोरोनाचा प्रभाव राज्यासह तालुक्यात कायम आहे.तालुक्यात सातत्याने नवीन संक्रमीत रुग्ण सापडत आहेत.त्यामुळे धोका कायम आहे.सौम्य आजारासाठी विशेष मेडिकल ट्रीटमेंटची गरज कमी नाही,ते त्यांच्या चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीने बरे होतात.मात्र ज्या रुग्णामध्ये मध्यम किंवा तीव्र स्वरूपाची लक्षणे असतात.त्यांना दवाखान्यामध्ये वेळीच दाखल करून उपचार देणे गरजेचे आहे. 




सध्या सांगली जिल्ह्याचा मुत्यू दर चिंताजनक आहे.यात कोरोनाबाबत असलेली अनाठायी भिती व उपचारासाठी असलेली उदासीनता कारणीभूत आहे.रुग्णाच्या रक्तातील ऑक्सीजनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्यावर रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्याने उपचाराचा गोल्डन पिरेड हा चुकतो व रुग्ण दगावण्याची शक्यता बळावते आहे.या सर्व पार्श्वभूमीवर जत सारख्या ठिकाणी डॉ.शरद पवार,डॉ.शालीवाहन पट्टणशेट्टी यांच्या सारख्या दिग्गज फिजिशियन्सच्या मार्गदर्शनाखाली पांढरा बंगला शेजारील वस्तीगृहाच्या प्रशस्त इमारातीमध्ये एक अद्यावत व सर्व अत्याधुनिक सोईयुक्त ‘कोविड हॉस्पिटल’ सुरू करण्यात आले आहे.




Rate Card

शासनाच्या निर्धारित दरापेक्षा कमी दर व व्हेटीलेंटर,ड्युरा ऑक्सीजन सारख्या अत्याधुनिक सुविधासह प्रशिक्षित डॉक्टरांकडून येथे कोरोना रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत.सध्या तालुक्यातील रुग्णासाठी हे कोविड हॉस्पिटल वरदान ठरत आहे.

या कोविड हॉस्पिटलमध्ये आपल्या शहरातील डॉ.मलिकार्जून काळगी,डॉ.रोहन मोदी,डॉ.राजाराम गुरव अशा प्रसिद्ध डॉक्टरांचे अनुभव या रुग्णासाठी उपयोगी ठरत आहेत.त्याशिवाय आए एम् ए व निमा असोसिएशनच्या प्रशिक्षित डॉक्टरांचीही साथ मिळत आहे.या कोविड हॉस्पिटल मुळे मिरज-सांगली किंवा इतर ठिकाणी रुग्णाची होणारी परवड थांबली आहे.




कोविड हॉस्पिटल सुरू झाल्यापासून प्रचंड प्रतिसाद लाभला आहे.सर्वाधिक महत्वपुर्ण म्हणजे येथील चार्जेस हे शासनाच्या निर्धारित दरापेक्षा कमी असल्याने सर्वांना परवडणारे दर आहेत.कोरोना रुग्णांच्या उपचारामध्ये फिजीशीयनची भूमिका महत्वाची असते.अशा वेळी एक नव्हे तर दोन नामाकिंत फिजीशियन व इन्टेसिव्हीस्ट यांच्याकडून उपचार मिळत असल्याने रुग्णांमधून समाधान व्यक्त होत आहे. सध्या जत कोविड हॉस्पिटल येथे 50 आयसीयू बेड उपलब्ध आहेत.




प्रशस्त हवेशीर वार्ड,व्हेंटीलेटर,ईसीजी,एक्स रे,लँबोरेटरी,मॉनीटर,सेंट्रल ऑक्सीजन,ड्युरा/ या सुविधा रुग्णांना मिळत आहेत.प्रशिक्षित डॉक्टर,व काळजीवाहू स्टॉप कार्यरत असल्याने कोरोना बाधित रुग्णांना मोठा धीर मिळत आहे.परिणामी तालुक्यातील कोरोना मुक्त होणारी संख्या वाढत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.