मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला ‘भोपळा’ घेवून प्रकाश शेंडगे नाचताहेत : विक्रम ढोणेचा आरोप

0



जत,प्रतिनिधी :”धनगर एसटी आऱक्षणप्रश्नी राज्य सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडण्याची भाषा करणारे माजी आमदार प्रकाश शेंडगे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ‘म्याव’ झाले. बैठकीतून बाहेर आल्यावर प्रकाश शेंडगे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलत 

होते.या बैठकीच्या माध्यमातून ठाकरे सरकारने समाजाच्या डोळ्यात धुळफेक केली आहे,” या शब्दांत धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी टीका केली आहे.










 उद्धव ठाकरेंनी धनगर समाजाला भोपळा दिला तो प्रकाश शेंडगे नाचवत आहेत, असा आरोपीही ढोणे यांनी केला आहे.

धनगर एसटी आऱक्षणप्रश्नी काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची धनगर नेत्यांबरोबर चर्चा झाली.माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या बैठकीत आऱक्षणप्रश्नी अँडव्होकेट जनरलशी चर्चा करण्याचे ठरले आहे. यासंदर्भाने धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी आपली भुमिका मांडली आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी प्रकाश शेंडगे हे शिवसेनेचे पाठीराखे झाले. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते.ते पुर्ण करून घेण्याची जबाबदारी प्रकाश शेंडगेंची आहे, मात्र हेच शेंडगे आता आरक्षणप्रश्नापेक्षा स्वत:ला दखलपात्र बनवण्याचा केविलवाणी प्रयत्न करत आहेत.






 महिनाभरापुर्वी मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याची चर्चा सुरू झाली. त्यावर धनगर आरक्षणाचाही जीआर काढावा अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली. हा जीआर काढण्यासाठी राज्य सरकारला ‘सळो की पळो’ करण्याचा इशारा ते देत राहिले.मात्र कालच्या बैठकीत ते हा मुद्दाही ठोसपणे मांडू शकले नाहीत.आर पारची भाषा बोलणारे शेंडगे हे अँडव्होकेट जनरलच्या चर्चेवर समाधानी झाले.त्यांच्या बदलेल्या भुमिकाच सर्वकाही सांगून जात आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर स्वत:चे महत्व वाढवून घेतले, या बैठकीतून समाजाला काही मिळाले नाही, असे विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे.


Rate Card





माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात धनगर समाजाला 5 वर्षे खेळवण्यात आले,तसाच प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडूनही सुरू आहे.आजवर अनेकवेळा अँडव्होकेट जनरलशी चर्चा झाली आहे. आता पुन्हा चर्चा करण्याचे आश्वासन मिळाले आहे.यात काही नवीन नाही, मात्र प्रकाश शेंडगे हे आरक्षणप्रश्नी मुख्ययमंत्रीम उद्धव ठाकरे पॉझिटिव्ह असल्याचे आनंदाने सांगत आहेत. उद्धव ठाकरे हे बेलभांडार उधळणार असल्याचे शेंडगे म्हणत आहेत. यापद्धतीने प्रकाश शेंडगे समाजाची दिशाभूल करत आहेत. ”हे पॉझिटिव्ह आहेत ते पॉझिटिव्ह आहेत”, हे ऐकून समाजाचे कान किटले आहेत.आता पुन्हाही तेच सांगितले जात आहे. यापार्श्वभुमीवर अँडव्होकेट जनरलशी चर्चा करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित केली होती का, हे शेंडगेंनी आता समाजाला सांगायला पाहिजे. राज्य शासनाने जीआर काढावा, यासाठी ही बैठक होती.







गरज होती तर या बैठकीला अँडव्होकेट जनरलला बोलवायला हवे होते. मात्र धनगर समाजाला हे सरकार गाभिर्य घेत नाही, त्यामुळे त्यांनी अँडव्होकेट जनरलला बोलावले नाही. प्रकाश शेंडगे यांनी मूळ मुद्यावर सरकारला घाम फोडायला हवा होता, मात्र ते म्याव झाले. ते सरकारची भाषा बोलू लागले. राज्य शासनाचा जीआर हा विधी विभागाचा विषय आहे. अँडव्होकेट जनरलचा संबंध लावून सर्व विषय न्यायप्रविष्ट दाखवण्याचा सरकारचा डाव आहे. कालच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी धनगर समाजाला भोपळा दिला आणि तो प्रकाश शेंडगे नाचवत आहेत. हे समाजाचे दुर्दैव आहे, असे ढोणे यांनी म्हटले आहे. 






समाजाला फसवू नका!


शिवसेनेच्या कोट्यातून राज्यपालनियुक्त आमदारकी मिळावी, यासाठी प्रकाश शेंडगे हे प्रयत्नशील असल्याची चर्चा चार महिन्यांपासून आहे. त्यांना आमदारकी मिळाली तर आमचा आक्षेप नाही. मात्र त्यासाठी आरक्षणप्रश्नी दिशाभुल करू नये, अशी अपेक्षा आहे. जनतेपुढे बोलताना मोठमोठे इशारे द्यायचे आणि प्रत्यक्ष बैठकीत सोयीस्कर भुमिका घ्यायची, हा प्रकार काही बरोबर नाही. काल सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीनंतर प्रकाश शेंडगे यांनी मराठा समाजाच्या संबंधाने जी माहिती पत्रकारांना दिली ती थक्क करणारी आहे. राज्य शासनाने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे तो तांत्रिक कारणामुळे मराठा समाजाने दिलेल्या इशाऱ्याचा काही संबंध नाही, असे शेंडगे यांनी म्हटले आहे. प्रकाश शेंडगे हे वेगळ्याच विश्वात वावरत आहेत, हे यावरून दिसते आहे. उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते म्हणूनच ते बोलत आहेत, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.