धनाजी मोटेचा खून प्रेमप्रकरणातून | रवीवारी रात्री घडला होता थरार | चौघाविरोधात गुन्हा दाखल

0

जत,प्रतिनिधी : कंठी ता.जत येथे भर चौकात प्रेमप्रकरणातून सराईत गुंडाची निर्घण हत्या करण्यात आली आहे. धनाजी नामदेव मोठे (वय 42) असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास हा थरार घडला.या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी कंठीतील नामदेव भीमा लांडगे, गोविंद नागेश लांडगे, मुरलीधर मधुकर वाघमारे, श्रीधर मधुकर वाघमारे, (सर्व रा. कंठी, ता.जत)चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून नागेश लांडगे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

जत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी,

धनाजी मोटे याचे कंठीतील एका अविवाहित मुलीशी अनैतिक सबंध होते.गेल्या काही दिवसापुर्वी मुलीने हे प्रेमसंबध तोडले होते.या कारणातून मुलीच्या घरचे आणि धनाजी यांच्यात वाद सुरू होते.


 याप्रकरणी, मुलीच्या  घरच्यांनी मुलीची बदनामी,दमदाटी असे जत पोलीस ठाण्यात धनाजी मोटे याच्यावर गुन्हे दाखल केले होते.मोटे हा सातत्याने मुलीची छेड काढणे,दमदाटी करत होता.यांचा राग मनात धरुन गुरुवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास गावातील बाज व बागेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यानजिकच्या मरगूबाई मंदिरासमोर मोटे याला चौकात अडवले.त्याला जाब विचारत

मोटेवर गोळ्या झाडून आणि डोके दगडाने ठेचून त्याची हत्या केली.


घटनेची माहिती मिळताच जतचे डीवायएसपी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले.त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.घटनास्थळी एक गावठी पिस्तुल, चार बंदुकीच्या गोळ्या सापडल्या आहेत. तर हे पिस्तुल नेमके आरोपीचे होते की मृताचे? हे अजून स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी मृताचा भाऊ संदीप नामदेव मोटे (वय 38,रा.कंठी,सध्या बामणोली) यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.


Rate Card

दहशतीचा अंत 

धनाजी मोटे सराईत गुन्हेगार होता.त्यांच्यावर जत,सांगली पोलीस ठाण्यात शस्ञाची तस्करी,दमदाटी सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय प्रेम संबध असलेल्या मुलीच्या घराच्यावर त्यांने दहशत निर्माण केली होती.या दहशतीतून सुटका करण्यासाठी संशयितांनी हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.पिस्तूमधील चार गोळ्याच्या पुगळ्या


मोटेचा खून झालेल्या ठिकाणी एक पिस्तूल व चार गोळ्याच्या पुतळ्या आढळून आल्या आहेत.नेमके हे पिस्तूल कोणाचे आहे,मोटेवर गोळ्या झाडल्यात का याबाबत अधिकृत्त माहिती अद्याप मिळालेली नाही.पोलीसांनी मोटेचा मृत्तदेह शवविच्छेदनासाठी सांगलीला पाठविला होता.


चौघाविरोधात गुन्हा दाखल


प्रेमसंबधातील मुलीचे नातेवाईक असलेल्या चौघाविरोधात मोटेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.यातील एकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य तिंघाचा शोध सुरू आहे.अधिक तपास पो.नि.उत्तम जाधव अधिक तपास करत आहेत.

कंठी ता.जत येथील घटनास्थळावर पडलेल्या बंदुकीतील गोळ्याच्या पुंगळ्या

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.