डफळापूर-अंनतपूर रोडची दुरूस्तीचे आदेश
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पश्चिम भागाला कर्नाटकाशी जोडणाऱ्या डफळापूर-अंनतपूर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत.यामुळे सातत्याने अपघात होत आहे.हा रस्ता दुरुस्त होणार तर कधी,असा सवाल पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी पंचायत समितीच्या बैठकीत उपस्थित केला होता.
या रस्त्याबाबत दैनिक संकेत टाइम्समध्ये वस्तूनिष्ठ बातम्या प्रसिध्द होत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभाग करतो तरी काय अशी आक्रमक भूमिका मांडली होती.
यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात येईल असे आश्वासन यावेळी चव्हाण यांना दिले.

