‘जत अंनिस’कडून प्रभाकर सनमडीकर यांना आदरांजली

0

जत,(प्रतिनिधी): जत तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सनमडीकर यांना आदरांजली वाहण्यात आली. जत येथील बौद्ध विहार येथे झालेल्या कार्यक्रमात विविध सामाजिक संस्था-संघटना व अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 सदर प्रसंगी प्रा.चंद्रसेन माने पाटील यांनी प्रभाकर सनमडीकर हे आगळेवेगळे व्यक्तिमत्व होते.ते कोणत्याही सामाजिक प्रश्नासाठी पुढाकाराने सहभाग घेऊन , सर्वांना एकत्रित करुन एकोप्याने पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते.त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. अंनिस च्या माध्यमातून त्यांनी भरीव काम जत तालुक्यात केले.त्यांचे विचार अंनिस व आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करु. श्रद्धा सनमडीकर यांनी अंनिसचे कार्य पुढे नेण्याचा व त्यांचे विचार सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या भुमिकेतून पुढे चालवणार ,अशा भावना व्यक्त केल्या.Rate Card

अंनिस चे कार्याध्यक्ष इब्राहीम नदाफ यांनी प्रभाकर सनमडीकर यांचे कार्य अतुलनीय होते. चाकोरीबाहेर जावून सर्वांना सामावून घेऊन,एकोपा व जवळीकता निर्माण करुन काम करण्याचे धाडस व कसब होते,असे म्हणाले.


 सुधिर चव्हाण, सुनिल सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले व रवि सांगोलकर यांनी आभार मानले.यावेळी कॅ.विजय कुरणे,दत्तात्रय शिंदे, डॉ. एस. एन.राव ,अर्जुन कुकडे,बबन कांबळे,गोरख कांबळे, विष्णू रास्ते येळवी, सिद्धार्थ सनमडीकर,शारदा कांबळे, कमल ऐदाळे, नंदादीप कांबळे व पत्रकार नजीरभाई चट्टरगी व हरिष शेटे उपस्थित होते.
shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.