रस्ते कामामुळे जतेत वाहतूक कोंडी
जत,प्रतिनिधी : जत शहरातील विजापूर-गुहागर मार्गाचे काम गेल्या काही दिवसापासून गतीने सुरू आहेत.गटारी,मजबूतीकरण,क्रॉक्री
जत शहरातील चडचण कॉर्नर ते संस्कृती हॉटेल पर्यत दोन वर्षापासून रखडलेल्या मार्गाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे.संस्कृत्ती हॉटेल ते निगडी कॉर्नरपर्यत दोन्ही लाईनचे सीमेंट क्रॉक्रिटचे काम पुर्ण करण्यात आले आहे. तेथील दोन्ही बाजूच्या गटारीचे काम सुरु आहे.निगडी कॉर्नर ते स्टँडपर्यतच्या मार्गाचे मजबूतीकरणाचे काम सुरू आहे.येथे पाण्याची पाईपलाईन,फायबर केबल,नाल्यामुळे अडचणी येत आहेत.दोन्ही बाजूकडून रस्ता खोदून मजबूतीकरणाचे काम सुरू आहे.

त्यामुळे एकेरी मार्ग सुरू आहे. येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. स्टँडपासून चडचडण कॉर्नर पर्यत एका लाईनचे क्रॉक्रिटकरण करण्यात आले आहे.दुसरी लाईनचे मजबूती करणासह गटारीचे कामे गतीने सुरू आहेत.पुढील महिन्याभरात काम पुर्ण करण्याची तयारी सुरू आहे.त्यामुळे मोठी गती आली आहे.परिणामी वाहतूक कोंडी वाढली आहे.
