येळवी ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ
जत,प्रतिनिधी : येळवी ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा विविध मान्यवराच्या हस्ते संपन्न झाला.
विश्वास कोळी घर ते जयसिंग वाणी घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीटची बंदिस्त गटार,ओंकार स्वरूपा चौक ते जयसिंग वाणी यांच्या घरापर्यंत पेविंग ब्लॉक कामाचे लोकार्पण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्त आयोगातून विविध विकास कामांचा शुभारंभ बनाळी पंचायत समिती गटाचे सदस्य रवींद्र सावंत यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी परिवर्तन पॅनलचे पॅनल प्रमुख पंचाक्षरी अंकलगी,उपसरपंच सुनिल अंकलगी,ओंकार स्वरुपा फौंडेशन संस्थेचे अध्यक्ष दीपक अंकलगी,ग्रा.पं.सदस्य संतोष पाटील,पत्रकार मारूती मदने,रोहन कन्स्ट्रक्शनचे राजकुमार धोत्रे,खैराव ग्रा.पं.सदस्य कोंडीबा घुटुकडे,भाऊसाहेब कदम, शंकर आवटे,प्रविण तोडकर, संतोष स्वामी,नवनाथ पवार,राजू कदम,सय्यद शेख उपलब्ध होते.
सांड पाण्यासाठी गटारीसह पेव्हिंग ब्लाॅकची सातत्याने मागणी होती.

पावसाळ्यात या रस्त्याची दुरावस्था होत होती.सांडपाणी सार्वजनिक भागात साठून डांसाचे साम्राज्य पसरत होते.या रस्त्यावरील ब्लॉक व गटारीच्या कामामुळे या भागातील नागरिकांची सोय होणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
संतोष पाटील,ग्रा.पं.सदस्य येळवी
येळवी ता.जत येथील ब्लॉकच्या कामाचे उद्घाटन करताना पं.स.सदस्य रविंद्र सांवत व मान्यवर उपस्थित होते.
