रेवनाळच्या संरपचाविरोधात अविश्वास ठराव दाखल
जत,प्रतिनिधी : रेवनाळचे लोकनियुक्त
संरपच धनाजी बाबासाहेब पाटील
यांच्याविरोधात 9/0 ने अविश्वास ठराव तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे दाखल झाला आहे.
रेवानाळ येेथे सुमारे पावनेतीन वर्षापुर्वी
भाजपचे बाळासाहेब लोंखडे,राष्ट्रवादीचे मच्छिद्र वाघमोडे गटात निवडणूक झाली होती.त्या निवडणूकीत लोंखडे गटाचे थेट संरपच धनाजी पाटीलसह चार सदस्य तर वाघमोडे गटाचे पाच सदस्य विजयी झाले होते.साडेतीन वर्षानंतर संरपचाकडून विकास कामे होत नसल्याच्या कारणावरून लोंखडे व वाघमोडे गटाच्या सदस्यांनी एकत्रित येत संरपचा विरोधात 9/0असा अविश्वास ठराव दाखल केला आहे.
ठरावनंतर आता महसूल प्रशासनाकडून साधारणत:7 दिवसात मीटिंग घेण्यात येणार आहे.दरम्यान जर हि निवडणूक झाली तर नव्या कायद्यानुसार होणार आहे.यात अविश्वास ठराव मंजूर झाला तर त्याला ग्रामसभेची तरतूद वगळण्यात आल्याने सदस्यामधून नवी निवडणूक होणे शक्य आहे.
संरपचानी अपेक्षाभंग केला
गेल्या साडेतीन वर्षापुर्वी आम्ही नागरिकांना विकासाची आश्वासने देऊन विजय मिळविला होता.मात्र लोकनियुक्त धनाजी पाटील यांनी विकास कामे केली नाहीत,सदस्यांना विश्वास घेतले नाही.जनतेच्या अपेक्षाचा भंग केला आहे. त्यांच्या विरोधात नाराजी आहे.त्यामुळे 9 विरूध 0 ने अविश्वास ठराव दाखल केला आहे.
बाळासाहेब लोंखडे,मच्छिंद्र वाघमोडे

जेष्ठ नेते
अविश्वास ठराव दाखल
रेवनाळ संरपच धनाजी पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठराव आमच्याकडे दाखल झाला आहे.पुढील कारवाई निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार होणार आहे.
सचिन पाटील, तहसीलदार