उमराणीत गांज्या शेतीवर छापा | साडेसतरा लाखाचा ओला गांज्या जप्त,एकास अटक | स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0उमराणी,वार्ताहर : जत उमराणी येथे गांज्याच्या शेतीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांने छापा टाकत 17 लाख 76 हजार किंमतीचा 147 किलो वजनाचा ओला गांजा जप्त केला.मंगळवारी सकाळी ही कारवाई केली.याप्रकरणी मल्लाप्पा ईरगोडा बिराजदार यांच्या विरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलीस अधीक्षक श्री दिक्षीत गेडाम,अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुवुले मॅडम, यांनी सांगली जिल्ह्यात गांजाची लागवड करणा-या व गांजा विक्री करणारे इसमाची माहिती काढुन त्याचेवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी गांजाची लागवड करणा-या व गांजा विक्री इसमाची माहिती काढुन त्याचेवर कारवाई करणेसाठी खास पथक तयार केले आहेत.

दिनांक 6 ऑक्टोंबरला जत विभागमध्ये पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, स.पो.फौ अच्युत सुर्यवंशी, राजेद्र मुळे, जितेंद्र जाधव, आमसिध्दा खोत, राजु शिरोळकर, महादेव धुमाळ, सचिन कुंभार,मुदतसर पाथरवट, राहुल जाधव, प्रशांत माळी,असे शासकीय वाहनाने पेट्रोलिग करीत गांजाची लागवड करणा-या व गांजा विक्री करणारे इसमाची माहिती घेत असताना पो.ना.मुदतसर पाथरवट यांना खास बातमीदारामार्फत उमराणी ता.जत गावी मल्लाप्या ईरगोडा बिराजदार यांनी ऊसाचे शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. 

माहिती प्रमाणे पोलीस अधिकारी पोलीस स्टाफ व पंचाने उमराणी गावी मल्लाप्पा ईरगोडा बिराजदार याचे ऊसाचे शेतात छापा मारुन शेतमालक यास ताबेत घेऊन पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, यांनी त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव मल्लाप्पा ईरगोडा बिराजदार वय-65, रा उमराणी ता. जत जि. सांगली असे असल्याचे सागितले, त्यावेळी मल्लाप्पा बिराजदार याचे ऊसाचे शेतात पंचासमक्ष पाहणी केली असता त्याचे ऊसाचे शेतात 147 किलो वजनाचा किमत रुपये 17,लाख 76 हजार रुपयाचा ओला गांजाची झाडे मिळाली ते सविस्तर पंचनाम्याने जप्त करुन आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाणे येथे रिपोर्टने देणेत आला आहे.

Rate Card

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे , पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, सपोफी अच्युत

सुर्यवंशी, राजेद्र मुळे, जितेंद्र जाधव, आमसिध्दा खोत, राजु शिरोळकर, महादेव धुमाळ, सचिन कुंभार, मुदतसर पाथरवट, राहुल जाधव, प्रशांत माळी अरुण सोकटे यांनी पार पाडली.


shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.