बँक ऑफ इंडियाच्या बोर्गी शाखेतील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार

0बालगाव,वार्ताहर जत तालुक्यातील बोर्गी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील कर्मचाऱ्याच्या मनमानी कारभाराला पगारदार शिक्षकासह इतर ग्राहक वैतागले आहेत.बँकेत येणाऱ्या ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे उद्धटपणे देत अरेरावी करत ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देण्याचे प्रकार हे कर्मचारी मागील अनेक दिवसापासून करीत आहेत. शिवाय कोरोनाचे कोणत्याही प्रकारच्या शिस्तीचे पालन केले जात नाही.त्यामुळे बँकेत कोरोना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच

सतत होणाऱ्या इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या सर्व प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन बँकेची सेवा विनम व सुरळीत करावी अशी मागणी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप हिंदुस्थानी यांनी कोल्हापूरचे महाप्रबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की,

बोर्गी बँक ऑफ इंडिया शाखेतील कर्मचाऱ्याकडून ग्राहकांना वाईट वागणूक दिली जात आहे.लहानसहान कामासाठी शाखेतील कर्मचारी विलंब करतात.याबाबत ग्राहाकानी विचारणा केल्यास उद्धटपणे वागणूक दिली जाते.महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत करणेसाठी परिपत्रक काढलेले होते.सांगली जिल्ह्यातील परिपत्रकानुसार प्राथमिक शिक्षकांनी बँक ऑफ इंडिया या बँकेत सॅलरी खाती काढली आहेत.
गेल्या पाच महिन्यापासून शासनाकडून बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पगार केले जात आहे. पगाराच्या संदर्भात काही शिक्षकानी माहिती किंवा चौकशी करायला बँकेत गेल्यास बँक कर्मचाऱ्याकडून माहिती दिली जात नाही. बँक कर्मचाऱ्याकडून अजिबात सहकार्य मिळत नाही.उलट शिक्षकाबरोबर

उद्दटपणे बोलून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे.बँक व्यवस्थापक व कॅशियरकडून अरेतुरेची भाषा वापरली जाते. मासिक पगार खात्यावर वर्ग करायला दोन तीन दिवस उशिराने वर्ग केले जाते.शासनाकडून पगार होऊनही बँकेच्या गलथान आणि हलगर्जीपणामुळे उशिराने पगार मिळतो.या प्रकाराची

Rate Card

चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.तसेच एक दिवसात होणारे कामाला अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात त्यातही तासनतास ताटकळत

बसल्यानंतर संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी आज आपले काम होणार नाही उद्या पाहू असे सोयीस्कर उत्तरे ग्राहकाला दिले जातात यामुळे पुन्हा ग्राहकांना दुसऱ्या दिवशी आपल्या कामासाठी बँकेत हेलपाटे मारण्याचा प्रसंग ग्राहकावर येत आहे,परिणामी विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.शेतकऱ्यांच्या नावावर आरटीजीएस करण्यासाठी टाकलेले पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी दोन-तीन दिवसाचा अवधी बँकेत लागत असून संबंधित ग्राहकांनी विचारणा केल्यास सर्वर डाऊन आहे कनेक्टिविटी नसल्याचे कारण देऊन अधिकारी वेळ मारून नेहतात या होणाऱ्या प्रकारामुळे बोर्गी व परिसरातील ग्राहक त्रस्तझाले आहेत या संदर्भात अनेक ग्राहकांनी बँकेच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करूनही त्याचा फारसा उपयोग न झाल्याने बॅकेत ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
 या सर्व प्रकारामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांमुळे व इतर अडचणीमुळे व्यवहार ठप्प होण्याचा प्रकार घडत आहे.हा सर्व प्रकार घडत असल्याने ग्राहकात बँकेच्या व्यवहाराविषयी प्रचंड नाराजी असल्याचे आहे. या प्रकाराची योग्य चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदुस्तानी यांनी निवेदनात केली आहे.
shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.