राहत्या घरात गँसचा स्फोट | प्रतापपूर येथील घटना ; तीन लाखाचे नुकसान,सुदैवाने जिवीतहानी टळली

0जत,प्रतिनिधी : प्रतापपूर ता.जत येथील लता गुलाब मोटे यांच्या झोपडी वजा घरात गँस सिलेंडरचा स्फोट होऊन घर भस्मसात झाले.यात एक दुचाकी, सोने,चांदीचे दागिणे,संसारउपयोगी साहित्याचे सुमारे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.घटना रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.याप्रकरणी प्रकाश गुलाब मोटे यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे.पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी,प्रतापपूर येथील लता मोटे व त्यांचा मुलगा प्रकाश मोटे, त्यांचे कुंटुब जवळच स्वतंत्र राहतात.लता मोटे या एकट्या राहतात.रविवारी सकाळी आठच्या दरम्यान लता मोटे यांनी नेहमीप्रमाणे स्वयंपाक करून काहीतरी कामानिमित्त घराबाहेर आल्या होत्या.त्यावेळी अचानक गँस जोराचा स्फोट झाला.एकदम झालेल्या या स्फोटात घराला आग लागली.
,बघता झोपडीतील सोने,चांदीचे दागिणे,धान्ये,संसार उपयोगी साहित्य,झोपडीच्या बाजूस लावलेली हिरो कंपनीची ड्युईट मॉडेलची(क्र.एमएच 10,सीवाय 5939) दुचाकी,गँस सिलेंडर स्फोटानंतर जळून खाक झाला आहे.स्फोट एतका भयानक होता कि,घरातील साहित्याचा कोळसा झाला आहे. तर घराचे अवशेष जळून खाक झाले आहेत.या घटनेत सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने लता मोटे या घराबाहेर असल्याने बालबाल बचावल्या आहेत.

Rate Card

दरम्यान पंतप्रधान उज्वला गँस योजनासह गँस वितरणाचे जाळे गाव, झोपडीपर्यत पोहचल्याने घरोघरी गँस सिलेंडर आले आहेत.एकीकडे गँसची जोडणीची गतीने होत आहे. मात्र या गँस वापराबाबत कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण अथवा मार्गदर्शन गँस कंपन्या अथवा एंजन्सीकडून दिले जात नाही.त्यामुळे गँस सिलेंडर वापराबाबत हलगर्जी पणा होतो.अनेक वेळा सिलेंडरचा गँस पुरवठा बंद केला जात नाही.वापरताना घ्यावयाची काळजीबाबत कोणत्याही सुचना दिल्या जात नाहीत.त्यामुळे वारवांर अशा घटना जत तालुक्यात घडत आहेत.अनेक नाहक जीव यामुळे गेले आहेत.मात्र अशा घटना सातत्याने होत असतानाही त्या रोकण्यासाठी कंपन्या,गँस एंजशा,शासनस्तरावर कोणत्याही उपाय योजना केला जात नाहीत.

प्रतापपूर ता.जत येथील गँसच्या स्फोटात जळून खाक झालेले झोपडी वजा घर

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.