शेगाव चौक ते अथणी रोडवर जीवघेणा खड्डा

0जत,प्रतिनिधी : शेगाव चौक ते बिळूरमार्गे अथणीला जोडणाऱ्या राज्यमार्गावर असलेल्या होंडा शोरूम समोर व गंर्धव नदीवरील पुलाची अतिशय बिकट अवस्था झाली असून, पुलाच्या मध्यभागी व कडेला दोन मोठी भगदाडे पडले आहे. याच पुलावरून रोज हजारो नागरिक, विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचा प्रवास जीव मुठीत धरून करीत आहेत. तर वाहन चालकांनाही वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.जत-अथणीला जोडणाऱ्या राज्यमार्गावरील पुलाच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले आहे.हिरो शोरूमसमोर एक भलामोठा खड्डा पडला आहे. तसेच पुलावर असंख्य लहान-मोठे खड्डेही पडलेले आहेत.या पुलाच्या दोन्ही बाजूस प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय व व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी येणारे हजारो विद्यार्थी याच पुलाचा वापर करीत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.गावातून अथणीमार्गे मुख्य चौक व विटा, वडूज, सातारा, कऱ्हाड व पुणे मुंबईसह इतर ठिकाणी जाण्यासाठी वाहनचालकांना याच पुलाचा आधार घ्यावा लागतो. याच पुलावर असंख्य खड्डे त्यातही पडलेली भगदाडे अरुंद व कमी उंचीचा पूल, रक्षक दगडावरती वाढलेली झुडपे व शिक्षणासाठी चालत असलेले हजारो विद्यार्थी व ग्रामस्थ त्यातून वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

Rate Cardजतहून अथणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेला खड्डा जीवघेणा बनला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.