खुजगांव येथे युवकाची गळफास घेवुन आत्महत्या

0शिराळा : शिराळा तालुक्यातील 

खुजगांव येथे शुक्रवारी सकाळी  शक्ती पांडूरंग सावंत  या 22 वर्षीय युवकाने  शेतातील झाडास दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.कोकरूड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांच्या कडून मिळालेली माहिती अशी, मयत शक्ती सावंत हा पुणे येथे एका खाजगी कंपनीत कामाला होता. पण  कोरोनाच्या कालावधीत लाॅकडाऊन झाल्याने तो गावी आई सोबत खुजगांव येथे रहात होता.  त्याचे वडील व मोठा भाऊ नोकरी निमित्त मुबंई येथे वास्तव्यास आहेत. सकाळी जनावराना वैरण आणण्यासाठी नेहमी प्रमाणे शक्ति रानात गेला होता.

Rate Cardरोजच्या पेक्षा जास्त वेळ झाला आणि घरी परत आला नसल्याने आईने शक्ती का आला नाही व कुठे आहे हे बघण्यासाठी शेजारील मुलांना पाटवले असता त्या मुलांना तो टाक्याचा माळ नावाच्या शेतात  झाडाला लटकत असल्याचा दिसून आला. शक्तीचे चुलते दतात्रय बाबूराव सावंत  यांनी कोकरूड पोलिसात फिर्याद दिली असून आत्महत्येच कारण आद्याप समजु शकलेल नाही. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम आधिक तपास करत आहेत.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.