जत तालुक्यात तिसऱ्यादिवशी 58 जण कोरोना मुक्त | नवे 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; आणखीन दोघाचे मुत्यू

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोना मुक्त होणारी संख्या वाढली असून तिसऱ्या दिवशी 58 जण कोरोना मुक्त झाले आहेत.तालुक्यात आतापर्यत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णाची संख्या एका हजारच्या पुढे जात 1056 वर पोहचली आहे.मात्र पुन्हा दोघाचे कोरोना मुळे मुत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.तालुक्यात शनिवारी 19 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात जत 7,आंवढी 1,उमदी 1,शेगाव 1,दरिबडची 2,जालीहाळ बु.1,सोरडी 1,गुड्डापूर 2,मुंचडी 1 येथे नवे रुग्ण आढळले आहेत.तालुक्याची कोरोना बाधित संख्या 1310 वर पोहचली आहे.सध्या 209 रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जत शहरातील संख्या 503 झाली आहे.
त्यातील 309 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे.शहरातील कोरोनामुळे 23 जणाचा मुत्यू झाला आहे.तर 24 ग्रामीण भागातील रुग्णाचा मुत्यू झाला आहे. कोरोना मुक्त संख्या वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होणारी संख्या वाढली आहे.त्यामुळे चिंता वाढली आहे.Rate Cardसांगली : सांगली जिल्ह्यात शुक्रवारी 497 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या, तर 11 व्यक्तींचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या पाचशेच्या आत आल्याने आणि मृत्युसंख्याही कमी झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात 685 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या.जिल्ह्यात शुक्रवारअखेर एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 38 हजार 125 झाली आहे.आजअखेर एकूण 29 हजार 817 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.सध्या 6 हजार 924 व्यक्ती उपचाराखाली आहेत.त्यापैकी 5 हजार 84 व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये आहेत.उपचाराखालील 922 व्यक्ती अतिदक्षता दाखल आहेत.
shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.