जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील शुक्रवारी कोरोना बाधिताचा आकडा कमी झाला.दिवसभरात एक जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.21 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 32 जण कोरोना मुक्त झाले आहे.
तालुक्यातील कोरोना आलेख खालावत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
शनिवारी जत 8,डफळापूर 3,रामपूर 1,कुणीकोणूर 1, सोरडी 1,संख 1,बेवनूर 5 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.
आतापर्यत 29 जणांचा कोरोना मुळे मुत्यू झाला आहे.हलकी लक्षणे असलेले 255 कोरोना बाधितावर सध्या होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. जत तालुक्याची गेल्या दिवसात कोरोना बाधित संख्या घटल्याने प्रशासन व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
डिस्टसिंग, मास्कचा वापर,सँनिटायझर आदी नियम नागरिकांनी काटेकोर पाळावेत,आम्ही तालुक्याला कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत,नागरिकांनी काळजी घेऊन सहकार्य करावे,असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी केले.










