दुचाकीवरून पडून एकजण ठार

0
5



जत,प्रतिनिधी : संख (ता. जत) ते अंकलगी जाणार्‍या रस्त्यावर दुचाकीच्या झालेल्या अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष कल्लप्पा कोळी (वय 36, रा.सिध्दनाथ, ता.जत) असे मृत व्यक्तीचे नाव असून सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या पूर्वी ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात ग्रामीण रूग्णालयाचे डॉ.इरकर यांनी फोन वरून माहिती दिल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.



संतोष कोळी हे सिध्दनाथहून अंकलगी येथे मामाला सोडण्यासाठी गेला होता.घरी परतताना अंकलगीपासून काही अंतरावर संतोष याच्या गाडीचा अपघात होऊन ते रस्त्यावर पडले असताना परिसरातील काही नागरिकांनी 10 रुग्णवाहिका बोलावून जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.दरम्यान त्यांचा मुत्यू झाला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here