संखमध्ये गांज्या शेतीवर छापा | उमदी पोलीसांची कारवाई : पावणेसहा लाखाची गांज्याची झाडे जप्त

0
5



जत,प्रतिनिधी : संख(ता.जत) येथे ऊस व तुरीच्या शेतातील गांज्या शेतीवर उमदी पोलीसांनी छापा टाकत 5 लाख 72 हजार 500 रूपयाचा गांज्या जप्त केला.

याप्रकरणी राजेंद्र शिवाण्णा बिरादार(रा.संख) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी, संख परिसरातील राजेंद्र बिरादार यांने ऊस व तुरीच्या शेतात गांज्याची लागवड केल्याची माहिती खबऱ्याद्वारे या भागात पेट्रोलिंग करत असलेले सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांच्या पथकाला मिळाली होती.



त्यानुसार बिराजदार यांच्या शेतात पथकांने छापा टाकला असता.तुरी व ऊसामध्ये गांज्याची झाडे आढळून आली.त्याची मोजणी केली असता ही ओली झाडे सुमारे सव्वाशे किलो गांज्या जप्त करण्यात आला.त्यांची बाजार भावाप्रमाणे 5 लाख 72 हजार 500 रुपये होतात.पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा,अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलिस अधिकारी  संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे, नितीन पलुस्कर,गडदे यांनी ही कारवाई केली आहे.


    

संख ता.जत येथे पकडलेल्या गांज्यासह पोलीस पथक 

       

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here