संख अत्याचार प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा | वचिंत बहुजन आघाडीचे निवेदन

0
16



जत,प्रतिनिधी : संख ता.जत येथील वयोवृद्ध महिलेवर अत्याचार केलेल्या आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी,तसेच पिडितेला पोलीस संरक्षण द्यावे,अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुक्यात अमोल सांबळे यांच्यावतीने करण्यात आली.







तसे निवेदन त्यांनी विभागीय पोलीस अधिकारी यांना दिले आहे.निवेदनात म्हटले आहे,संख येथे एका 65 वर्षीय महिलेवर  35 बलात्कार केला आहे.या घटनेला पंधवरडा उलटला तरीही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.








गंभीर घटना घडूनही उमदी पोलीस आरोपीला पकडण्यात अपयशी ठरले आहेत.त्यामुळे या घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी,पिडित महिलेला पोलिस संरक्षण द्यावे,असे म्हटले आहे.निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस प्रमुख,प्रांताधिकारी,तहसीलदार,यांनाही देण्यात आल्या आहेत.



संख घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करा,या मागणीचे निवेदन वचिंत बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here